शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चिंता वाढली! मलेशियात सापडलेल्या दहापट घातक कोरोना विषाणूचं 'भारत कनेक्शन' समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 09:01 IST

मलेशियात सापडलेलं कोरोनाचं नवं रूप १० पटीनं अधिक घातक

नवी दिल्‍ली: मलेशियात कोरोना विषाणूचं नवं रुप (स्ट्रेन) सापडलं आहे. हा विषाणू जगात इतरत्र सापडलेल्या कोरोना विषाणूपेक्षा दहापटीनं घातक आहे. त्यामुळे वैज्ञानिकांची चिंता वाढली आहे. कोरोनावरील लस शोधून काढण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यातच आता अधिक जीवघेणा विषाणू समोर आल्यानं वैज्ञानिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मलेशियात कोरोनाचा अधिक घातक विषाणू सापडला आहे. मलेशियात ४५ व्यक्तींना एकमेकांमुळे कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातील तीन जणांमध्ये कोरोनाचं नवं रुप (D614G) सापडलं. मलेशियात तीन व्यक्तींमध्ये कोरोनाचा D614G विषाणू सापडला. यातील एक जण रेस्टॉरंटचा मालक आहे. तो भारतातून मलेशियाला परतला होता. तो १४ दिवस होम क्वारंटिन राहिला नाही. त्यामुळे त्याच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव झाला. या व्यक्तीला पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मलेशियात आणखी एका क्लस्टरमध्येही D614G विषाणू सापडला आहे. या व्यक्ती फिलिपीन्समधून मलेशियाला परतल्या होत्या.D614G मुळे कोरोना अधिक घातक होतो. कोरोना विषाणू अधिक टोकदार झाल्यानं कोशिकांवर थेट हल्ला होतो. D614G पहिल्यांदा युरोपमध्ये दिसून आला. अमेरिकेतील विषाणूतज्ज्ञ डॉ. फॉसी यांनी या व्हायरसमुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो असं म्हटलं आहे. मलेशियाच्या आरोग्य विभागाचे डायरेक्टर जनरल नूर हिशाम अब्दुल्ला यांनी देखील कोरोना व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे गंभीर परिणाम पाहायला मिळू शकतात. आतापर्यंत लस तयार करण्यासाठी आणि व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी  विकसित करण्यात आलेली नवी पद्धतही यापुढे फेल होऊ शकते. या व्हायरसचा प्रसार हा अनेक देशांमध्येही होऊ शकतो. मलेशियामध्ये डी 614 जी हा व्हायरस आढळून आल्याने लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. तसंच आरोग्य विभागाची देखील चिंता वाढली आहे. मात्र लोकांनी अधिक सावधानता बाळगणं गरजेचं आहे. तरच या व्हायरसवर नियंत्रण मिळवणं शक्य होऊ शकतं असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या ही 21,824,807 वर पोहोचली आहे. तब्बल 773,032 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढलाVIDEO: ड्रॅगनची मोठी नाचक्की; शक्तिप्रदर्शनावेळी बघता बघता रणगाड्याला जलसमाधी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या