शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
2
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
3
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
4
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
5
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
6
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
7
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
8
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
10
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
11
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
12
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
13
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
14
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
15
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
16
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
17
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
18
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
19
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
20
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."

युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 18:04 IST

युगांडामध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि इतर वाहनांची धडक होऊन तब्बल ६३ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

युगांडामध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि इतर वाहनांची धडक होऊन तब्बल ६३ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. युगांडाची राजधानी कंपालाच्या उत्तरेला असलेल्या गुलू शहराला जोडणाऱ्या कंपाला-गुलू महामार्गावर बुधवारी सकाळी हा अपघात झाला, ज्यामध्ये एका बससह अनेक लहान आणि मोठी वाहनं एकमेकांवर आदळली.

स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या धडकेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. युगांडा पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तपासानंतर स्थानिक पोलिसांनी या अपघातात दोन बस आणि इतर चार वाहनांचा समावेश असल्याचं सांगितलं. बस चालकाने कंपाला-गुलू महामार्गावर एका लॉरीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाशी धडक झाली.

अचानक झालेल्या या धडकेनंतर मागून येणारी अनेक वाहनं एकमेकांवर आदळली, ज्यामुळे महामार्गावर गोंधळ उडाला. कंपाला पोलिसांनी सांगितलं की, अपघातानंतर बचाव आणि मदत पथकं तैनात करण्यात आली आहेत.

जखमी आणि अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकं सक्रियपणे काम करत आहेत. मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमींवर पश्चिम युगांडाच्या किरियानडोंगे शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भयानक आणि दुःखद अपघातानंतर कंपाला-गुलू महामार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. ६३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Uganda Crash: Bus Collision Kills 63, Many Severely Injured

Web Summary : A horrific bus crash in Uganda killed 63 people and severely injured many others. The accident occurred on the Kampala-Gulu highway, involving multiple vehicles. Initial reports suggest a bus attempting to overtake a lorry collided with oncoming traffic, triggering a chain reaction. Rescue operations are underway, and the highway is temporarily closed.
टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू