शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

US Iran Israel War: इराणशी लढणाऱ्या अमेरिकेला मोठा धक्का, 'या' युरोपीय देशानं डोनाल्ड ट्रम्प याचं टेन्शन वाढवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 19:41 IST

मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा झटका बसला आहे.

मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा झटका बसला आहे. युरोपीय देश स्वित्झर्लंडने आपल्या तटस्थता धोरणाचा दाखला देत अमेरिकेला होणाऱ्या शस्त्र निर्यातीवर तूर्तास बंदी घातली आहे. जोपर्यंत मध्य पूर्वेतील युद्ध थांबत नाही, तोपर्यंत ही निर्यात बंद राहील, असे स्विस सरकारने स्पष्ट केले आहे.

स्विस सरकारने शुक्रवारी (२० मार्च २०२६) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेला शस्त्र निर्यातीसाठी कोणतेही नवीन परवाने देण्यात आलेले नाहीत. इराणसोबत उघड शत्रुत्व असलेल्या कोणत्याही देशाला युद्धाच्या काळात शस्त्रांचा पुरवठा करणे स्वित्झर्लंडच्या कायद्यात बसत नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

स्वित्झर्लंडने आपल्या परराष्ट्र धोरणात नेहमीच तटस्थतेला महत्त्व दिले आहे. यापूर्वी २००३ मध्ये जेव्हा अमेरिकेने इराकवर आक्रमण केले होते, तेव्हाही स्वित्झर्लंडने अमेरिकेला शस्त्र निर्यात रोखली होती आणि स्विस हवाई हद्दीचा वापर करण्यासही मनाई केली होती. आता पुन्हा एकदा त्याच धोरणाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा एक विशेष गट अमेरिकेला होणाऱ्या शस्त्रास्त्र निर्यातीशी संबंधित घडामोडींचे मूल्यांकन करेल. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकेला कोणत्याही नवीन संरक्षण करारासाठी मंजुरी दिली जाणार नाही. स्वित्झर्लंडच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या संरक्षण पुरवठा साखळीवर (Supply Chain) परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. "शत्रुत्वामध्ये थेट वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या निर्यातीला सध्याच्या परिस्थितीत मंजुरी दिली जाऊ शकत नाही. तटस्थतेच्या कायद्यांतर्गत यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे, असे स्विस सरकारने नमूद केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Switzerland Blocks Arms Exports to US Amid Iran-Israel Conflict.

Web Summary : Amidst Mideast tensions, Switzerland halts arms exports to the US, citing neutrality. This impacts US defense supply chains during the Iran-Israel conflict. The decision mirrors past actions during the Iraq War. No new export licenses will be issued presently.
टॅग्स :Warयुद्धAmericaअमेरिकाIsraelइस्रायलIranइराणSwitzerlandस्वित्झर्लंड