शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 23:51 IST

इराणच्या इसफहान येथील अणु ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात तेहरानचे किमान तीन वरिष्ठ कमांडर मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत. इस्रायलने शनिवारी जाहीर केले की ते दीर्घकाळासाठी युद्धाच्या तयारीमध्ये आहेत. इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी रात्री इराणच्या इसफहान येथील अणु ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात तेहरानचे किमान तीन वरिष्ठ कमांडर मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे. तर, एका अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

इसफहानचे डेप्युटी गवर्नर फॉर सिक्योरिटी अफेयर अकबर सालेही यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, इस्रायलने अणु संशोधन सुविधेचे नुकसान केले आहे. मात्र, त्यांनी कोणतीही जीवितहानी झाल्याचे सांगितले नाही. इस्रायली लष्कराने इसफहानच्या या अणुभट्टीला दुसऱ्यांदा लक्ष्य केले आहे. युद्ध सुरू झाल्याच्या २४ तासांच्या आतच इस्रायलने या ठिकाणावर एकदा हल्ला केला होता.

इस्रायलचे लक्ष्य: इराणची अणुक्षमता नष्ट करणे!इस्रायलचे म्हणणे आहे की, त्यांना इराणची अणुक्षमता पूर्णपणे नष्ट करायची आहे. इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला आणि दक्षिण-पश्चिम भागात बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू आले. प्रत्युत्तर म्हणून इराणनेही पुन्हा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. उत्तर इस्रायलमधील एका दुमजली इमारतीवर ड्रोन हल्ला करण्यात आला, ज्यात ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इराणकडून होणारे हल्ले आकाशातच थोपवले जात आहेत. त्यांच्यासाठी इस्रायलवर हल्ला करणे खूप कठीण आहे. त्यांनी असेही म्हटले की, इराणकडे ताकद नाही, हे नाकारता येणार नाही. आजच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी म्हटले होते की, जर या युद्धात अमेरिकाही सामील झाली, तर ते सर्वांसाठी खूप धोकादायक ठरेल.

बंडखोरांची अमेरिकेला धमकीरिपोर्टनुसार, १३ जून रोजी इस्रायलने इराणच्या लष्करी आणि अणु ठिकाणांवर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे अनेक उच्च कमांडर आणि अणुवैज्ञानिकही मारले गेले होते. यानंतर इराणनेही इस्रायलवर हल्ले सुरू केले. इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान ४०० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. इराण समर्थित हुती बंडखोरांनी धमकी दिली आहे की, जर ट्रम्प प्रशासनाने इराणविरोधात इस्रायलच्या लष्करी कारवाईत सहभाग घेतला, तर ते लाल समुद्रात अमेरिकी जहाजे आणि युद्धनौकांवरील हल्ले पुन्हा सुरू करतील.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध