डिजिटल हल्ल्यानं जग हादरलं! सर्वसामान्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं; एवढी प्रचंड असते एका बिटकॉईनची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:32 PM2020-07-16T12:32:06+5:302020-07-16T12:36:01+5:30

ज्या प्रकारे रुपये आणि डॉलर आहेत, त्याच प्रकारे बिटकॉईन असतो. हे एक डिजिटल चलन आहे. ते केवळ डिजिटिल बँकेतच ठेवता येते. अद्याप हे काही बँकांतच लागू करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी एका बिटकॉईनची किंमत  प्रचंड आहे.

Major America twitter accounts hacked in bitcoin scam | डिजिटल हल्ल्यानं जग हादरलं! सर्वसामान्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं; एवढी प्रचंड असते एका बिटकॉईनची किंमत

डिजिटल हल्ल्यानं जग हादरलं! सर्वसामान्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं; एवढी प्रचंड असते एका बिटकॉईनची किंमत

Next
ठळक मुद्देहे अकाउंट हॅक केल्यानंतर, सर्व अकाउंट्सवरून ट्विट करत बिटकॉईच्या स्वरुपात पैशांची मागणी केली जात होती.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स आणि वॉरेन बफे, अशा अनेक दिग्गजांचे अकाउंट हॅक करण्यात आले होते.ज्या प्रकारे रुपये आणि डॉलर आहेत, त्याच प्रकारे बिटकॉईन असतो.

नवी दिल्ली - सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स आणि इन्व्हेस्टमेंट गुरू वॉरेन बफे, अशा अनेक दिग्गज मंडळींचे अकाउंट हॅक करण्यात आले.

हे अकाउंट हॅक केल्यानंतर, सर्व अकाउंट्सवरून ट्विट करत बिटकॉईच्या स्वरुपात पैशांची मागणी केली जात होती. बिल गेट्स यांच्या ट्विटर अकाऊंटवरून लिहिन्यात आले होते, की प्रत्येक जण मला सांगत आहेत, की ही समालाजा परत देण्याची वेळ आहे. तर मी सांगू इच्छितो, की पुढील तीस मिनिटांत जे पेमेन्ट मला पाठवले जाईल, मी त्याच्या दुप्पट देईल. आपण 1000 डॉलरचा बिटक्वाइन पाठवा, मी 2000 डॉलर परत पाठवीन. मात्र, आता ही समस्या दूर करण्यात आली आहे.

ज्या प्रकारे रुपये आणि डॉलर आहेत, त्याच प्रकारे बिटकॉईन असतो. हे एक डिजिटल चलन आहे. ते केवळ डिजिटिल बँकेतच ठेवता येते. अद्याप हे काही बँकांतच लागू करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी एका बिटकॉईनची किंमत  प्रचंड आहे. गुंतवणुकीचा विचार करता, लोकांना हे अत्यंत आकर्षक वाटते. सध्या हे जगातली सर्वात महाग चलन आहे. एका बिटकॉईनची किंमत 7 लाख रुपयांच्या जवळपास आहे.

लाखो यूजर्सना बसला कोट्यवधीचा फटका - 
सायबर सिक्योरिटीच्या अल्पेरोविच यांनी सांगितले, की या हल्ल्यामुळे सर्वसामान्यांना मोठे नुकसान झाले आहे. या हॅकदरम्यान हॅकर्सने जवळपास 300 लोकांकडून तब्बल 1 लाख 10 हजार डॉलर बिटकॉईन उकळले आहेत.

डिजिटल हल्ला - 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अॅमेझॉन प्रमुख जेफ बेजोस, डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन आणि मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांच्यासंह अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट एकाच वेळी हॅक करण्यात आले. तसेच, प्रत्येकाच्या अकाउंटवरून एकच ट्विट करण्यात आले, आपण बिटकॉईनच्या माध्यमाने पैसे पाठवा आणि आम्ही आपल्याला दुप्पट पैसे देऊ.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: चिंताजनक!; कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत 606 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती गंभीर

गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात

"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

Web Title: Major America twitter accounts hacked in bitcoin scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.