चीनमध्ये मोठा अपघात, जहाज आणि बोटीच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू; पाच जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:46 IST2025-03-01T11:44:31+5:302025-03-01T11:46:20+5:30

दक्षिण चीनमधील एका नदीत तेल सांडलेले साफ करणारे जहाज आणि एका लहान बोटीची टक्कर झाली. या घटनेत किमान ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Major accident in China, 11 dead, five missing after ship and boat collide | चीनमध्ये मोठा अपघात, जहाज आणि बोटीच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू; पाच जण बेपत्ता

चीनमध्ये मोठा अपघात, जहाज आणि बोटीच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू; पाच जण बेपत्ता

दक्षिण चीनमधील नदीत तेल सांडल्यानंतर साफसफाई करणाऱ्या एका जहाजाने एका लहान बोटीला धडक दिली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला,या घटनेत पाच जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. शुक्रवारी रात्री सरकारी माध्यमांनी या अपघाताची माहिती दिली होती.

मंगळवारी सकाळी हुनान प्रांतातील युआनशुई नदीत एका जहाजाने एका लहान बोटीला धडक दिल्याने १९ जण पाण्यात पडले. यात तिघांना वाचवण्यात यश आले.

महाकुंभमुळे चर्चेत आलेल्या 'IIT वाले बाबा'ला बेदम चोपलं?; डिबेट शोवेळी झाला राडा

ही घटना जास्त खोलीच्या ठिकाणी घडली. या ठिकाणी नदी ६० मीटर पेक्षा जास्त खोल आणि ५०० मीटर रुंद आहे. शोध आणि बचाव कार्य सुरूच आहे.

तीन जणांची चौकशी सुरू

वाचलेल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकांनी सांगितले की, ते गावात ये-जा करण्यासाठी बोटीचा वापर करत होते. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तेल सांडलेले ठिकाण साफ करणारे एक मोठे जहाज शांत पाण्यात मागून एका बोटीला कसे धडकते हे दिसून येते.  जहाजावरील तीन जणांची पोलीस चौकशी सुरू आहे आणि त्यापैकी कोणीही जखमी झाले नाही.

Web Title: Major accident in China, 11 dead, five missing after ship and boat collide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन