लंडन: शिक्षण आणि समाजावर प्रभाव पाडल्याबद्दल १,००,००० डॉलर्सच्या प्रतिष्ठित पारितोषिकासाठी निवडलेल्या टॉप ५० जणांमध्ये भारतातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
‘चेग डॉट ओआरजी ग्लोबल स्टुडंट प्राइज २०२५' हा सन्मान किमान १६ वर्षे वयाच्या व शैक्षणिक संस्था वा प्रशिक्षण व कौशल्य कार्यक्रमात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये जयपूरच्या जयश्री पेरिवाल इंटरनॅशनल स्कूलचा आदर्श कुमार आणि मन्नत सामरा यांचा समावेश आहे. तसेच, महाराष्ट्राच्या जळगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा धीरज गतमाने, बंगळुरूच्या 'द इंटरनॅशनल स्कूल'चा जहान अरोडा व दिल्लीमधील 'हेरिटेज इंटरनॅशनल एक्सपिरीयन्स स्कूल'चा शिवांश गुप्ताचा समावेश आहे. १४८ देशांमधून आलेल्या अर्जांमधून त्यांची निवड करण्यात आली.