जादू! म्हातारी झाली तरुणी! पाहा व्हीडीओ..

By Admin | Updated: June 6, 2017 16:36 IST2017-06-06T16:18:30+5:302017-06-06T16:36:18+5:30

तरुणींनाही लाजवणाऱ्या सत्तरीच्या आजीबाई बिकिनी घालून तरुणांना करताहेत घायाळ..

Magic! Old woman became pregnant! Watch video .. | जादू! म्हातारी झाली तरुणी! पाहा व्हीडीओ..

जादू! म्हातारी झाली तरुणी! पाहा व्हीडीओ..

- मयूर पठाडे

हा शेजारचा फोटो पाहा. किती वर्षांची आहे ही बिकिनीतील तरुणी? वीस? पंचवीस? तीस?.. त्याच्यापेक्षा तर नक्कीच तिचं वय जास्त नाहीए ना?
पण सपशेल आपटी खाल्लीत तुम्ही! तुमचा अंदाज पार गडगडला.
ही तरुणी आहे चार नातवांची आजी आणि तिचं वय आहे ७० वर्षे!
दचकलात ना?
या आजीबार्इंची आणखी माहिती हवी?
आणि त्या एवढ्या तरुण कशा झाल्यात हेही तुम्हाला जाणून घ्यायचंय ना?
या आजीबार्इंचं नाव आहे कॅरोलिन हार्टझ आणि त्या आहेत आॅस्ट्रेलियातील पर्थ येथील.
त्यांना गोड खाण्याची खूप आवड होती आणि त्यासाठी त्यांचा हातही फारसा आखडत नव्हता, पण तीस वर्षांपूर्वी त्यांना ‘प्रि-डायबेटिस’ डायग्नॉस झाला, म्हणजे त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नॉर्मलपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं. हा डायबेटिस नव्हता, पण ती धोक्याची एक घंटा होती. ही घंटा त्याचवेळी त्यांच्या डोक्यात वाजली आणि त्यांनी ठरवलं, आता साखर सोडायची.. आणि त्याचक्षणी त्यांनी साखर, गोड खाणं सोडलं ते आजतागायत.

 


या आजीबार्इंनी नेमकं काय केलं, म्हणून त्यांचं वय इतकं कमी झालं, याबाबतचा शोध घेण्यात नेटकऱ्यांत आता चढाओढ लागली आहे.
आजीबार्इंनी या नेटकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे, ‘साखरेपासून दूर राहा आणि न चुकता व्यायाम करा. तुम्हीही माझ्यासारख्याच तरुण दिसाल आणि व्हालही..’

 

 

Web Title: Magic! Old woman became pregnant! Watch video ..