शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:03 IST

महत्वाचे म्हणजे, व्हाइट हाऊसच्या प्रवक्ता एना केली यांनी या भेटीचा धागा असीम मुनीर यांनी केलेल्या शिफारशीसोबत जोडला आहे.

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना अमेरिकेने, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाइट हाऊस येथे लंचचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य अणु युद्ध रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे नोबेल शांती पुरस्कारास पात्र आहेत, असे मुनीर यांनी म्हटल्यानंतर, हे आमंत्रण देण्यात आले. माध्यमांतील वृत्तांनुसार, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यात व्हाइट हाऊस येथे बुधवारी (18 जून 2025) एका बंद खोलीत चर्चा झाली.

महत्वाचे म्हणजे, व्हाइट हाऊसच्या प्रवक्ता एना केली यांनी या भेटीचा धागा असीम मुनीर यांनी केलेल्या शिफारशीसोबत जोडला आहे. केली म्हणाल्या, पाक लष्करप्रमुखांनी ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळावा, याची शिफारस केली होती. यानंतर,टम्प यांनी त्यांना व्हाइट हाऊसमध्ये एका खाजगी जेवणासाठी आमंत्रित केले. 

माध्यमांसोबत बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी एक युद्ध रोखले... मला पाकिस्तान आवडतो, मोदी अत्यंत अद्भुत व्यक्ती आहेत. मी काल रात्रीच त्यांच्यासोबत चर्चा केली. आम्ही भारतासोबत व्यापार संबंधांसंदर्भात काम करत आहोत." ते पुढे म्हणाले, भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर होते. असीम मुनीर पाकिस्तानकडून होते, मोदी भारताकडून सक्रिय होते. दोन्हीही अणुशक्ती होत्या. मात्र ते युद्ध मी रोखले.”

ट्रम्प यांची ऑफर भारताने नाकारली - माध्यमांतील वृत्तांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी त्यांना कॅनडाहून परतताना अमेरिकेतून जाण्याची विनंती केली होती, जेणेकरून दोन्ही नेते भेटू शकतील. मात्र, पंतप्रधान मोदींनी हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला. जर पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले असते, तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीरही त्याच वेळी तेथे उपस्थित असते. अशा परिस्थितीत, ट्रम्प पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा मुद्दा उपस्थित करू शकत होते. भारताने ट्रम्प यांच्या या राजकी संदेशाला स्पष्टपणे नकार दिला.

मोदींनी आधीच स्पष्ट केलंय - ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मे महिन्यात झालेला युद्धविराम हा भारत-पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या परस्पर चर्चेचा परिपाक आहे. यात अमेरिका अथवा इतर कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेप नाही," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, असे असतानाही, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली "शांततेचा पुरस्करता", अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तानIndiaभारतNobel Prizeनोबेल पुरस्कारOperation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदी