ट्रम्प यांचे मोलकरणीशीही 'लफडं'; माजी कर्मचाऱ्याकडून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 20:27 IST2018-08-25T20:22:33+5:302018-08-25T20:27:25+5:30
तोंड बंद ठेवण्यासाठी 30 हजार डॉलर दिले

ट्रम्प यांचे मोलकरणीशीही 'लफडं'; माजी कर्मचाऱ्याकडून खुलासा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनैतिक संबंधांबाबत आज मोठा खुलासा झाला आहे. ट्रम्प वर्ल्ड टॉवरच्या एका माजी कर्मचाऱ्याने हा खुलासा केला असून एका माजी मोलकरणीसोबत (हाऊसकीपर) ट्रम्प यांचे प्रेमप्रकरण होते, असा दावा या कर्मचाऱ्याने केला आहे. या संबंधांतून ट्रम्प यांना एक अपत्यही असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.
हे प्रेमप्रकरण आणि मुलाबाबतची माहिती लपविण्यासाठी माजी कर्मचारी डिनो सजुदीन याला तेव्हा 30 हजार डॉलर दिले गेले. तसेच त्याने तोंड बंद ठेवावे म्हणून 2015 मध्ये करारही करून घेतला गेला. हा करार अमेरिकन मिडीया इंक (AMI) सोबत करण्यात आला. म्हणजेच ही गोष्ट यापुढे AMI च्या मालकीची राहणार होती. यामुळे ही गोष्ट सजुदीन कोणालाही सांगू शकत नव्हता. AMI ही नॅशनल इंक्वायरची मूळ कंपनी आहे.
या करारामध्ये ट्रम्प यांचे त्यांच्या कार्यालयामधील मोलकरणीशी असलेल्या अनैतिक संबंध आणि त्यातून जन्मलेल्या मुलाची गोष्ट आणि त्यावेळी घडलेल्या इतर संबंधीत गोष्टींवर यापुढे सजुदीनचा काहीही संबंध राहणार नाही. ही गोष्ट आता AMI च्या मालकीची झाली आहे. AMI कडे विशेष अधिकार आहेत.
सजुदीन याच्या वकीलाने सांगितले की, सजुदीन हे आता या करारातून मुक्त झाले आहेत. यामुळे ते या विषयावर बोलू शकतात.