शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचाराचे मनावर आणि शरीरावर दीर्घकाळ परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 13:56 IST

लैंगिक अत्याचाराचे केवळ मानसिक परिणामच नाहीत तर शारीरिक परिणामही आहेत असे या संशोधनातील प्रमुख अभ्यासक कॅरेस्टन कोनेन यांनी सांगितले. अशा अत्याचाराचे शरीरावर परिणाम होतात याचा पुरावा या संशोधनातून मिळाल्याचे व त्या परिणामांकडे लक्ष देण्याची गरज आहे असे कोएनन यांनी सांगितले.

न्यू यॉर्क- लैंगिक अत्याचाराचे किंवा नकोशा अनुभवाचे परिणाम कितीकाळ राहू शकतात त्याबद्दलची कटू आठवण किती काळानंतर उफाळून येऊ शकते याबद्दल मी टू कॅम्पेनमुळे अमेरिकेत सध्या मोठी चर्चा सुरु आहे. मात्र एका नव्या संशोधनातून लैंगिक अत्याचाराला किंवा दुर्वर्तनाला बळी पडलेल्या व्यक्तीला जबर मानसिक आणि शारीरिक किंमत मोजावी लागू शकते असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या व्यक्तीला नैराश्य, काळजी, उद्वेग आणि पीटीएसडी म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डरचा सामना करावा लागतोच तसेच उच्च रक्तदाब आणि निद्रानाशाचाही त्रास होऊ शकतो असे या संशोधनात समोर आले आहे.         लैंगिक अत्याचाराचे केवळ मानसिक परिणामच नाहीत तर शारीरिक परिणामही आहेत असे या संशोधनातील प्रमुख अभ्यासक कॅरेस्टन कोनेन यांनी सांगितले. अशा अत्याचाराचे शरीरावर परिणाम होतात याचा पुरावा या संशोधनातून मिळाल्याचे व त्या परिणामांकडे लक्ष देण्याची गरज आहे असे कोएनन यांनी सांगितले. बॉस्टन येथिल टी.एच. चान स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ येथे त्या प्राध्यापक आहेत. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेएएमए इंटर्नल मेडिसिन या नियतकालिकामध्ये ३ आॅक्टोबर रोजी निबंध प्रसिद्ध केला आहे. सॅन दिएगो येथे होणाऱ्या नॉर्थ अमेरिकन सोसायटी आॅफ मेनोपॉज या संस्थेच्या संमेलनातही तो वाचला जाईल. या अभ्यासाचा मूळ उद्देश ४० ते ६० या वयातील महिलांमधील रजोनिवृत्ती आणि धमनीकाठीन्य यांचा संबंध तपासणे हा होता. या संशोदनासाठी सरासरी वय ५४ असणाऱ्या ३०० महिलांची निवड करण्यात आली होती, त्या सर्व पिटसबर्गच्या रहिवासी होत्या. त्यांची शारीरिक तपासणी व मानसिकधक्क्यांसदर्भात प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते.

यातील १९ टक्के महिलांनी कामाच्या ठिकाणी शाब्दिक किंवा शारीरिक अत्याचार अनुभवल्याचे तसेच २२ टक्के महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आणि १० टक्के महिलांनी दोन्ही अनुभव गतकाळात आल्याचे सांगितले. त्यामध्ये लैंगिक अत्याचार आणि उच्च रक्तदाब यांचा संबंध असल्याचे दिसून आले. उच्च रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी गोळ्या न घेणाऱ्या महिलांना हृद्यरोगाचा धोका असल्याचे आणि मेदाचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसले. झोप पुरेशी न झाल्याने त्यांना निद्रानाशाचा धोकाही असल्याचे यात लक्षात आले. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणHealthआरोग्य