VIDEO : भर रस्त्यात दोन महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, केस खेचले अन् एकमेकींचे कपडेही फाडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 12:11 IST2021-11-10T11:59:20+5:302021-11-10T12:11:01+5:30
England : अचानक बोलता बोलता दोन महिलांचं भांडण सुरू झालं. तिथे या महिलांच्या मैत्रीणीही उपस्थित होत्या. त्यांनी या दोघींना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काही एक ऐकलं नाही.

VIDEO : भर रस्त्यात दोन महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, केस खेचले अन् एकमेकींचे कपडेही फाडले...
ब्रिटनमध्ये (Britain) एका पबबाहेर दोन महिलांमध्ये जोरदार फाइट झाली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी दोघींचं भांडण सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या काही एकमेकींना सोडायला तयार नव्हत्या. बराचवेळ दोन्ही महिला एकमेकींना मारहाण (Two Women Fight Video) करत राहिल्या. यादरम्यान दोघींनी एकमेकींची कपडेही फाडले. रस्त्यावर सुरू असलेल्या या फ्री स्टाईल हाणामारीला बघण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.
‘डेली मेल’ च्या रिपोर्टनुसार, इंग्लंड (England) च्या वेस्ट मिडलॅंड्स (West Midlands) मध्ये टाउन कॅरिअर पब बाहेर शनिवारी ही घटना घडली. अचानक बोलता बोलता दोन महिलांचं भांडण सुरू झालं. तिथे या महिलांच्या मैत्रीणीही उपस्थित होत्या. त्यांनी या दोघींना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काही एक ऐकलं नाही. त्या वेड्यासारख्या एकमेकींचे केस खेचत राहिल्या. जमिनीवर पडल्यावरही त्यांचं भांडण सुरूच होतं.
बराचवेळ चालली फाइट
दोन्हीही महिला एकमेकींवर भारी पडल्या होत्या. असं वाटत होतं की, जशी रिअल WWF फाइट सुरू आहे. भांडता भांडता महिलांनी एकमेकींचे कपडेही फाडले. बराच वेळी हा प्रकार सुरू राहिला. यावेळी लोकांनी त्यांचं भांडण सोडण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांना त्यात काही यश आलं नाही. एका महिलेने तर दुसऱ्या महिलेचा गळा आवळून धरला होता.
काय होतं भांडणाचं कारण?
अजून हे स्पष्ट होऊ शकलं नाही की, अखेर कोणत्या गोष्टीवरून दोन्ही महिला भांडत होत्या. असं मानलं जात आहे की, शनिवारच्या पार्टी दरम्यान कोणत्या तरी गोष्टीवरून त्यांच्यात वाद पेटला होता. छोट्या वादाचं नंतर भांडणात रूपांतर झालं. तेच पोलीस म्हणाले की, त्यांना यासंबंधी कोणतीही तक्रार मिळाली नाही. जर कुणी तक्रार केली तर कारवाई केली जाईल. महिलांच्या या फाइटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.