लंडन ब्रीजजवळ गोळीबार, नागरिकांसाठी तात्काळ पर्यटन बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 10:37 PM2019-11-29T22:37:11+5:302019-11-29T22:37:36+5:30

लंडन ब्रीजजवळ केवळ 20 सेकंदाच्या कालावधीत हा गोळीबार झाला आहे.

London Bridge shooting: What we know so far | लंडन ब्रीजजवळ गोळीबार, नागरिकांसाठी तात्काळ पर्यटन बंद

लंडन ब्रीजजवळ गोळीबार, नागरिकांसाठी तात्काळ पर्यटन बंद

googlenewsNext

लंडन - लंडनमधील प्रसिद्ध लंडन ब्रीजजवळ शुक्रवारी सायंकाळी गोळीबार आणि चाकू हल्ल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी संबंधित परिसराला वेढा घातला होता. या घटनेत काही नागरिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

लंडन ब्रीजजवळ केवळ 20 सेकंदाच्या कालावधीत हा गोळीबार झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजता ब्रीजजवळ चाकू हल्ला झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. ज्यावेळी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, त्यावेळी तेथे मुलांचा एक समूह आपापसात भांडत होता. पोलिसांनी पाहिल्यानंतर तेथील एका मुलावर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून अद्याप घटनेचा पूर्ण उलघडा झालेला नाही. पण, लंडन ब्रीज नागरिकांसाठी तूर्तास बंद करण्यात आला आहे.  


 

Web Title: London Bridge shooting: What we know so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.