लंडनमध्ये लॉरी कंटेनरमध्ये सापडले 39 जणांचे मृतदेह; परिसरात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 14:55 IST2019-10-23T14:55:28+5:302019-10-23T14:55:37+5:30
लंडनमधल्या एसेक्स भागात एका लॉरी कंटेनरमध्ये 39 जणांचे मृतदेह सापडले आहेत.

लंडनमध्ये लॉरी कंटेनरमध्ये सापडले 39 जणांचे मृतदेह; परिसरात उडाली खळबळ
लंडनः लंडनमधल्या एसेक्स भागात एका लॉरी कंटेनरमध्ये 39 जणांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. पोलिसांनी लॉरी कंटेनरच्या चालकालाही उत्तरी आयर्लंडमधून अटक केली असून, त्याची चौकशीही सुरू आहे. लॉरी कंटेनरचा ड्रायव्हर फक्त 25 वर्षांचा आहे.
पोलिसांना जे 39 मृतदेह सापडले, त्यातील 38 वयोवृद्धांचे आहेत, तर 1 तरुण आहे. लॉरी कंटेनर बुल्गेरियाहून आला होता. त्यानं शनिवारी होलिहेडच्या माध्यमातून देशात प्रवेश केला होता. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यात गुंतले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह कंटेनरमध्ये कुठून आले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
39 bodies were found in a lorry container in Essex. The lorry driver has been arrested: UK media
— ANI (@ANI) October 23, 2019