शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

Locusts Attack: आफ्रिकेवर कोरोनापाठोपाठ आणखी एक मोठं संकट, कीटकनाशक फवारण्यासाठी सरकारला तैनात कराव लागलं विमान

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 25, 2021 17:16 IST

टांझानियातील जिल्हा आयुक्‍त ओनेस्‍मो बिसवेलू यांनी म्हटले आहे, की 'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे. या नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे. (Locusts Attack)

ठळक मुद्देआफ्रिकेपासून भारतापर्यंत कहर माजवणाऱ्या नाकतोड्यांच्या झुंडी (Locusts) पुन्हा एकदा सक्रिय'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे.नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे.

डोडोमा - आफ्रिकेपासून भारतापर्यंत कहर माजवणाऱ्या नाकतोड्यांच्या झुंडी (Locusts) पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. आफ्रिकन (Africa) देश असलेल्या टांझानियाच्या (Tanzania) उत्‍तरेकडील किलिमंजारो भागात नाकतोड्यांनी भीषण हाहाकार माजवला आहे. यामुळे येथील शेतकरी धास्तावले आहेत. कारण त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यातच आता या झुंडी भारतात आणि पाकिस्तानातही येतात की काय, अशी भीती वाटू लगली आहे. (Locusts Attack northern region of Tanzania Africa damage crops india pakistan crisis will increase)

टांझानियातील जिल्हा आयुक्‍त ओनेस्‍मो बिसवेलू यांनी म्हटले आहे, की 'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे. या नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे. नाकतोड्यांवर नियंत्रण मिळविण्यात आम्हाला यश आले आहे. पिकांचे अधिक नुकसान झालेले नाही.' वातावरणात झालेल्या बदलामुळे पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत या नाकतोड्यांचा हल्ला झाल्याचे मानले जात आहे.

केनियासमोर खाण्याचं संकट -यापूर्वी, केनियामध्ये नाकतोड्यांचा सर्वात मोठा हल्ला झाला होता. यावेळी केनियाचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे केनियाची परिस्थिती एवढी बिघडली होती, की त्यांच्या समोर दोनवेळच्या खाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. नाकतोड्यांच्या या टोळ धाडीने आशिया आणि आफ्रिकन देशांत गेल्या वर्षापासूनच भयानक हाहाकार माजवला आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या टिकाणी पलायन करणाऱ्या या टोळ्या - Locusta migratoia जगात सर्वाधिक पसरल्या आहेत. यांच्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. 

पाकिस्तानमार्गे भारतातही आली होती अशी टोळधाड - गेल्या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात नाकतोड्यांची टोळधाड पाकिस्तानहून राजस्थानात पोहोचली होती. राजस्थानातील 18 आणि मध्य प्रदेशातील जवळपास 12 जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान करुन ही झुंड उत्तर प्रदेशातील झांसी आणि आग्र्यापर्यंत पोहचली होती. यावेळी उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात सतर्कतेची घोषणा केली होती. या टोळधाडीने उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्यांना जाळ्यात ओढले होते. यात आग्रा, अलीगड, मथुरा, बुलंदशहर, हाथरस, एटा, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, फारुखाबाद, कानपूर, झांशी, हमीरपूर आणि ललितपूर या जिल्ह्यांचा समावेश होता. 

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाIndiaभारतPakistanपाकिस्तानairplaneविमानFarmerशेतकरी