अपयशी देशांच्या यादीत पाकिस्तान टॉप 20 मध्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 05:46 PM2017-11-01T17:46:01+5:302017-11-01T17:48:25+5:30

जगातील सर्वाधिक अपयशी देशांच्या यादी समोर आली असून यामध्ये पाकिस्तानाचा समावेश टॉप 20 मध्ये झाला आहे.

In the list of failed countries, Pakistan top 20 | अपयशी देशांच्या यादीत पाकिस्तान टॉप 20 मध्ये 

अपयशी देशांच्या यादीत पाकिस्तान टॉप 20 मध्ये 

googlenewsNext

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक अपयशी देशांच्या यादी समोर आली असून यामध्ये पाकिस्तानाचा समावेश टॉप 20 मध्ये झाला आहे. फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सतर्फे प्रसिद्ध झालेल्या अहवालात पाकिस्तानला अपयशी देश म्हणून संबोधलं आहे. पाकिस्तानचा या यादीत 18 वा क्रमांक असून, त्यामुळे पाकिस्तानचं खरं रुप पुन्हा जगासमोर आलं आहे. 

पाकिस्तानला सातत्यानं पाठिशी घालणाऱ्या चीनमधील ब्रिक्स देशांच्या बैठकीतही एक संयुक्त घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आलं. यात पाकिस्तानाने किती दहशतवादी संघटनांना आश्रय दिला याची आकडेवारीसह नावं प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यातच आता फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत पाकिस्तानचा टॉप 20 देशांच्या यादीत समावेश झाला आहे.

अमेरिकेने पाकिस्तानाला दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं बंद करण्याचा वारंवार समज देऊनही, पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची ओळख संपूर्ण जगात दहशतवाद्यांचा आश्रित देश म्हणून झाली आहे. अमेरिकेतील एका प्रतिनिधी सभेतही पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्यासाठी एक प्रस्ताव नुकताच देण्यात आला होता. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही दहशतवादी कारवायांवरुन पाकिस्तानच्या नेतृत्वाला खडेबोल सुनावले होते.

Web Title: In the list of failed countries, Pakistan top 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.