नैरोबीच्या रस्त्यावर सिंह

By Admin | Updated: March 19, 2016 01:41 IST2016-03-19T01:41:56+5:302016-03-19T01:41:56+5:30

नजीकच्या अभयारण्यातून वाट चुकलेल्या सिंहाने केनियाची राजधानी नैरोबीत ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केला. लोक सिंहाचे सेल्फी काढण्यासह गाड्यांचे भोंगे वाजवत होते.

Lion on the road of Nairobi | नैरोबीच्या रस्त्यावर सिंह

नैरोबीच्या रस्त्यावर सिंह

नैरोबी : नजीकच्या अभयारण्यातून वाट चुकलेल्या सिंहाने केनियाची राजधानी नैरोबीत ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केला.
लोक सिंहाचे सेल्फी काढण्यासह गाड्यांचे भोंगे वाजवत होते. त्यामुळे जंगलचा राजा चिडला, असे एका वन्यजीव अधिकाऱ्याने सांगितले. सिंहाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सिंह अभयारण्यात परतला आहे. गेल्या महिन्यात अनेक सिंह अभयारण्यातून निसटल्यामुळे नैरोबीत प्रचंड दहशत निर्माण झाली होती. शहरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते.

Web Title: Lion on the road of Nairobi