शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

वायुप्रदूषणामुळे जगात आयुर्मान ३ वर्षांनी होतेय कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 6:01 AM

​​​​​​​‘कार्डिओवास्कुलर रिसर्च’मध्ये प्रकाशित या निष्कर्षात असेही म्हटले आहे की, जग प्रदूषणाच्या साथीचा सामना करीत आहे.

बर्लिन : वायू प्रदूषणामुळे जगातील लोकांचे आयुर्मान जवळपास ३ वर्षांनी कमी होत आहे. जर्मनीतील ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्री’च्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. या संशोधनातून ही बाब समोर आली आहे की, युद्ध किंवा अन्य प्रकारचा हिंसाचार आणि मलेरिया, एड्स व धूम्रपानामुळे होणाऱ्या रोगांपेक्षा प्रदूषणामुळे आयुष्यघटण्याचे प्रमाण अधिक आहे.‘कार्डिओवास्कुलर रिसर्च’मध्ये प्रकाशित या निष्कर्षात असेही म्हटले आहे की, जग प्रदूषणाच्या साथीचा सामना करीत आहे. या संशोधनातून असेही दिसून आले आहे की, जगात २०१५ मध्ये प्रदूषणामुळे ८८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या तुलनेत मलेरियामुळे ६ लाख मृत्यू झाले, तर हिंसाचारामुळे (युद्धासह) ५ लाख ३० हजार मृत्यू झाले. यात असेही आढळून आले की, हृदयरोग, मेंदूशी संबंधित रोगांसाठीही वायू प्रदूषण जबाबदार आहे. वायू प्रदुषणामुळे श्वसन मार्गातील संसर्ग, फुμफुसाचा कॅन्सर, स्ट्रोक आणि अन्य आजार होतात. वायू प्रदूषणामुळे काही देशांत वृद्ध लोकांचे आयुर्मान कमी झाल्याचेही दिसून आले, तर आफ्रिका आणि दक्षिण आशियातील कमी उत्पन्नाच्या देशात पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाणही दिसून आले. जागतिक स्तरावर वायू प्रदूषणाचे ७५टक्के मृत्यू हे ६० वर्षांवरील व्यक्तींचे होतात.मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्रीतील प्रोफेसर जोस लेलिवेल्ड म्हणतात की, तंबाखूमुळे होणारे नुकसान वा अन्य कारणास्तव होणारे मृत्यू यापेक्षा वायू प्रदूषणामुळे होणारी हानी आणि मृत्यू हे अधिक आहेत. याच इन्स्टिट्यूटमधील थॉमस मुन्जेल यांचे म्हणणे आहे की, वायू प्रदूषणाचा लोकांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम अपेक्षेपेक्षा खूपच अधिकआहे. वायू प्रदूषण आणि धूम्रपान दोन्हीही रोखले जाऊ शकते; पण मागील दशकात वायू प्रदूषणाकडे खूपच कमी लक्ष दिले गेले, असेही ते म्हणाले.>लहान मुलांचाही मृत्यूवायू प्रदूषणामुळे काही देशांत वृद्ध लोकांचे आयुर्मान कमी झाल्याचेही दिसून आले, तर आफ्रिका आणि दक्षिण आशियातील कमी उत्पन्नाच्या देशात पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाणही दिसून आले.