3 हजार कोटींना विकलं गेलं लिओनार्डो द विंचीचं 500 वर्षं जुनं पेंटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 04:39 PM2017-11-16T16:39:48+5:302017-11-16T16:41:45+5:30

Leonardo da Vinci's 500 years old painting was sold for 3 thousand crores | 3 हजार कोटींना विकलं गेलं लिओनार्डो द विंचीचं 500 वर्षं जुनं पेंटिंग

3 हजार कोटींना विकलं गेलं लिओनार्डो द विंचीचं 500 वर्षं जुनं पेंटिंग

googlenewsNext

न्यू यॉर्क- इटालियन चित्रकार लिओनार्डो दि विंची हे त्यांच्या अप्रतिम चित्रांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगविख्यात असलेल्या लिओनार्डो दि विंची यांनी मोनालिसाचं रेखाटलेलं चित्र फारच चर्चेत आलं. त्यांच्या चित्रांना जगभरातून मागणी आहे. अमेरिकेत लिओनार्डो द विंची यांनी बनवलेल्या येशू ख्रिस्तांच्या 500 वर्ष जुन्या पेंटिंगचा 45 कोटी डॉलर म्हणजेच 3 हजार कोटी रुपयांना लिलाव झाला आहे. या पेंटिंगचा लिलाव हा जगभरातील सर्वात महागडा लिलाव आहे.

19 मिनिटे चाललेल्या या बोलीवर खरेदीदारानं टेलिफोनवरून बोली लावली आहे. परंतु अद्यापही खरेदीदाराचा नाव उघड करण्यात आलेलं नाही. येशू ख्रिस्तांच्या या पेंटिंगचं नाव साल्वाडोर मुंडी असे आहे. या पेंटिंगनं 2015मध्ये पिकासोची पेंटिंग वुमन ऑफ एल्जियर्सचा लिलावाचाही रेकॉर्ड तोडला आहे. त्या पेंटिंगची विक्री 17.94 कोटी डॉलरला झाली होती. येशू ख्रिस्तांवर रेखाटलेलं हे पेंटिंग हरवलं होतं, परंतु 500 वर्षांपूर्वी या पेंटिंगचा अधिकारी फ्रान्सच्या शाही परिवाराला मिळाला होता. इतकेच नव्हे तर 1950च्या दशकात हे पेंटिंग फक्त 45 पौंड म्हणजेच जवळपास 3900 रुपयांत विकण्यात आलं आहे. 2005मध्ये पुन्हा त्या पेंटिंगचं 10 हजार डॉलरमध्ये लिलाव करण्यात आला होता. तर याच वर्षी रशियाच्या अब्जाधीशानं हे पेंटिंग 12.75 कोटी डॉलरला विकत घेतलं होतं. आता हे पेंटिंग ख्रिस्ती नावाच्या संस्थेनं 45 कोटी डॉलरला खरेदी केलं आहे. एवढ्या मोठ्या किमतीत एखादी व्यक्ती एक विमानही खरेदी करू शकते. ही किंमत एअरबस ए380-800च्या किमतीहूनही जास्त आहे. एअरबस ए380-800ला 43.26 कोटी रुपयांत विकत घेण्यात आलं आहे. तसेच पॅरिस सेंट फुटबॉल क्लबनं यंदा टॉप खेळाडू नेमार यालाही 26.1 कोटी डॉलरमध्ये विकत घेतलं होतं. 

प्रख्यात चित्रकार लिओनार्डो द विंचींनी मोनालिसाचं रेखाटलेलं फारच चर्चेत आलं होतं. जगातलं पहिलं चित्र असा ज्याचा उल्लेख केला जातो ते लिओनार्डो – द – विंचीनं काढलेलं मोनालिसाचं चित्र सध्या चर्चेत येण्याला कारणही तसंच दमदार आहे. मोनालिसाच्या चित्रासारखं हुबेहूब एक चित्र पॅरिसच्या शास्त्रज्ञांना सापडलं आहे. मात्र त्यातील व्यक्तीच्या अंगावर एकही वस्त्र दिसत नाही. ती व्यक्ती हुबेहूब विंचीच्या मोनालिसासारखी दिसते. या चित्रावर जगभरातील शास्त्रज्ञ आणि कलातज्ज्ञ गेल्या महिनाभर काम करीत आहेत. तेथील एका आर्ट गॅलरीमध्ये या दोन्ही फोटोंवर अभ्यास चालू आहे. आता सापडलेला फोटो विंचीच्या पहिल्या प्रख्यात फोटोचा सुरुवातीचा भाग असण्याची शक्यता तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत.

Web Title: Leonardo da Vinci's 500 years old painting was sold for 3 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.