पत्नीवरील प्रेमापोटी कापला पाय

By Admin | Updated: April 25, 2017 00:43 IST2017-04-25T00:43:23+5:302017-04-25T00:43:23+5:30

चीनी व्यक्तीने पत्नीच्या आनंदासाठी एक पाय कापून टाकला. तुम्हाला वाटेल की, पत्नी एवढी क्रूर कशी काय होऊ शकते.

The legs cut off the love of the wife | पत्नीवरील प्रेमापोटी कापला पाय

पत्नीवरील प्रेमापोटी कापला पाय

बीजिंग : चीनी व्यक्तीने पत्नीच्या आनंदासाठी एक पाय कापून टाकला. तुम्हाला वाटेल की, पत्नी एवढी क्रूर कशी काय होऊ शकते. पत्नी क्रूर नाही आणि पतीची पाय कापण्याची कृतीही चूक नाही. चीनमधील गरीब शेतकरी झेंग यानलियांग यांच्या पायांत ब्लड क्लॉटिंगची (रक्ताच्या गुठळ्या होणे) समस्या उत्पन्न झाली. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला; मात्र शस्त्रक्रियेसाठी पैसे नव्हते. तीन महिन्यांत शस्त्रक्रिया न केल्यास रक्त दूषित होऊन मृत्यू ओढवण्याचा धोका होता. यानलियांगने परिस्थिती मान्य केली होती; मात्र त्याची पत्नी दु:खी होती. यानलियांगला मृत्यूपेक्षाही पत्नीच्या दु:खाचे अधिक वाईट वाटत होते. त्यामुळे एका रात्री पत्नी झोपेत असताना त्याने चाकूने पाय कापून टाकला. रक्तस्रावानंतर त्याने पत्नीला उठविले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. यानलियांगने आपला जीवही वाचविला आणि पत्नीलाही आनंदी ठेवले.

Web Title: The legs cut off the love of the wife