शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

लास वेगसचा हल्ला इसिसचा नव्हे; तो माथेफिरुच, हॉटेलच्या खोलीत सापडल्या २३ बंदुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 04:00 IST

अमेरिकेला हादरवणारा लास वेगस येथील हल्ला इसिसने केला नसून हल्लेखोर माथेफिरूच असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने सांगितले. इसिसने हा हल्ला केल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत

मेघनाद बोधनकरलास वेगस/सॅन होजे : अमेरिकेला हादरवणारा लास वेगस येथील हल्ला इसिसने केला नसून हल्लेखोर माथेफिरूच असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने सांगितले. इसिसने हा हल्ला केल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत, असेही एफबीआयने म्हटले आहे.संगीत समारंभात गोळीबारी करून ५९ जणांचा बळी घेणाºया स्टिफन पॅडॉक या हल्लेखोराजवळ ‘बम्प स्टॉक’ नावाचे एक असे उपकरण होते जे सेमी आॅटोमॅटिक हत्याराचे रूपांतर पूर्ण आॅटोमॅटिक हत्यारात करू शकते. त्यातून प्रतिमिनिट ४०० ते ८०० राऊंड अशा गोळ्या चालतात. सेमी आॅटोमॅटिकमध्ये एक गोळी चालविण्यासाठी एकदा ट्रिगर दाबण्याची गरज असते, तर पूर्ण आॅटोमॅटिक हत्यारात एकदा ट्रिगर दाबल्यानंतर रायफलमधील पूर्ण गोळ्या संपेपर्यंत ते थांबत नाही.हल्लेखोर स्टिफन पॅडॉक यांच्या हॉटेलमधील खोलीत २३ बंदुका मिळाल्या आहेत. पॅडॉककडे दोन बम्प स्टॉक होते. या गोळीबारानंतर हल्लेखोराने स्वत:ला संपविले. त्याच्या घरातूनही बंदुका, स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्याच्या नेवाडाच्या मेक्वाइट येथील घरी झडती घेतली असता १८ बंदुका, काही स्फोटके आणि दारूगोळा सापडला. घरात काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही सापडली आहेत.या घटनेनंतर भारतीय-अमेरिकी संसद सदस्यांनी शस्त्रास्त्र नियंत्रण कायद्यात बदलाची मागणी केली आहे. प्रमिला जयपाल यांनी म्हटले आहे की, निर्दोष लोकांचे यात बळी जात आहेत. लोकांना मरतानापाहून आता अमेरिकी लोकही थकले आहेत.सिडनी : या हल्लेखोराची एक सहयोगी महिला म्हणून ६२ वर्षीय मारिलोऊ डॅनली यांच्याकडे बघितले जाते आहे, पण या हल्ल्याच्या वेळी त्या देशाबाहेर होत्या. अमेरिकी अधिकारी आमच्या संपर्कात असल्याचे आॅस्ट्रेलियाच्या विदेशमंत्री जुली बिशप यांनी सांगितले. या महिलेचा आयडी हॉटेलच्या बुकिंगसाठी वापरण्यात आला होता, असे सांगण्यात येत आहे. मारिलोऊ सध्या फिलिपीन किंवा जपानमध्ये असल्याचे समजते.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला