Laos dam collapse: लाओसमध्ये धरण फुटलं; शेकडो बेपत्ता, हजारो बेघर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 18:34 IST2018-07-24T18:19:31+5:302018-07-24T18:34:57+5:30
Laos dam collapse: दक्षिणपूर्व आशियाई देश असलेल्या लाओसमध्ये एक धरण फुटलं आहे.

Laos dam collapse: लाओसमध्ये धरण फुटलं; शेकडो बेपत्ता, हजारो बेघर
व्हिएंटियन- दक्षिणपूर्व आशियाई देश असलेल्या लाओसमध्ये एक धरण फुटलं आहे. या धरणाच्या पाण्यात अनेक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण पूर्वेकडच्या लाओसमध्ये एक हायड्रो इलेक्ट्रिक धरणं फुटल्यानं हजारो लोक वाहून गेले आहेत. स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना दक्षिण-पूर्व अटॅपू प्रांतात घडली आहे. धरण फुटल्यानं हजारो लोक पाण्यात वाहून गेले आहेत. तसेच अनेक जण बेपत्ता आहेत. यासंबंधीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य राबवलं जात आहे. सैन्यानं साई जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी धरणाच्या पाण्यात नौकाही उतरवल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत किती लोकांचे जीव गेले आहेत, हे अद्याप अस्पष्ट आहे. या धरणाच्या पाण्यामुळे जवळपास 6600 लोक बेघर झाली आहेत. अनेकांनी पुराच्या पाण्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराच्या छपराचा आसरा घेतला आहे.
तसेच घराच्या छतावर बसलेल्या लोकांचा सैन्याच्या जवानांनी बोटीच्या माध्यमातून बचाव केला आहे. मुसळधार पावसानं हे धरण वाहून गेल्याचं धरण तयार करणा-या कंपनीनं सांगितलं आहे. लाओस सरकारच्या आम्ही संपर्कात असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. आमची एक आपत्कालीन टीम घटनास्थळी रवाना केली असून, गावातील लोकांना वाचवण्यासाठी ती प्रयत्नशील असल्याचं धरणाचं बांधकाम करणा-या कंपनीनं सांगितलं आहे.
#BREAKING: Video from above the devastating dam failure after a hydroelectric dam collapsed in Laos. (Video: @Zeno7Inc) pic.twitter.com/QG3kL20Jjv
— BreakingNNow (@BreakingNNow) July 24, 2018