शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जन्माष्टमीदिवशीच पाकिस्तानमध्ये कृष्ण मंदिरांची मोडतोड, भाविकांनाही केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 12:35 IST

Krishna Mandir demolished in Pakistan: मंदिरात जन्माष्टमीची पूजा सुरू असतानाच हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत.

ठळक मुद्देपाकिस्तानमधील सिंध प्रांतातील संघर जिल्ह्यातील खिप्रोमध्ये समाजकंटकांकडून कृष्ण जन्माष्टमी दिवशीच कृष्ण मंदिरांची मोडतोडमंदिरात जन्माष्टमी साजरी करण्यासाठी सुरू असलेल्या सोहळ्यादरम्यान घडला प्रकार घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण, परिसरात पोलीस तैनात

कराची - पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील संघर जिल्ह्यातील खिप्रोमध्ये समाजकंटकांनी कृष्ण जन्माष्टमी दिवशीच कृष्ण मंदिरांची मोडतोड केली आहे. सोमवारी काही समाजकंटकांनी श्रीकृष्णाची मूर्ती तोडली. ही घटना मंदिरातजन्माष्टमी साजरी करण्यासाठी सुरू असलेल्या सोहळ्यादरम्यान घडली. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र आतापर्यं कुठल्याही आरोपीला अटक झालेली नाही. (Krishna Mandir demolished in Pakistan on Janmashtami day, devotees also beaten)

याबाबतची माहिती पाकिस्तानी अॅक्टिव्हिस्ट वकील राहत ऑस्टिन यांनी दिली आहे. त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, मंदिरात जन्माष्टमीची पूजा सुरू असतानाच हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये भाविकांना मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हिंदून मारहाण होणे ही सामान्य बाब आहे. या महिन्याच्या सुरुवातीला लाहोरपासून सुमारे ५९० किलोमीटर अंतरावर रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरामध्ये शोकडो लोकांनी एका हिंदू मंदिराचे नुकसान केले होते.

मानवाधिकार संस्था मुव्हमेंट फॉर सॉलिडॅरिटी अँड पीसच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानमध्ये दरवर्षी एक हजार हून अधिक ख्रिश्चन आणि हिंदू महिला आणि मुलींचे अपहरण केले जाते. त्यानंतर त्यांचे धर्मपरीवर्तन करून इस्लामिक पद्धतीने त्यांचा निकाह केला जातो. पीडित महिला आणि मुलींचे सरासरी वय १२ ते २५ दरम्यान असते.

अधिकृत अंदाजानुसार सध्या पाकिस्तानमध्ये ७५ लाख हिंदू वास्तव्यास आहेत. यामधील बहुतांश हिंदू हे सिंध प्रांतामध्ये आहेत. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अल्पसंख्याक आणि बिगर इस्लामी धार्मिक संस्थ्यांवरील हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. गतवर्षी सिंधमध्ये माता रानी भटियानी मंदिर, गुरुद्वारा श्री जन्मस्थान खैबर पख्तुनख्वामधील कराक येथील हिंदू  मंदिरासह पाकिस्तानमधील अनेक मंदिरांवर हल्ले झाले आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJanmashtamiजन्माष्टमीTempleमंदिर