शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

अन् अशी झाली सौदीच्या राजाची गोची, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 02:19 IST

सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ गेल्या बुधवारपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौ-यावर होते. रशियात त्यांचे आगमन होणार त्याचवेळी त्यांची जाम गोची झाली. 

ठळक मुद्देसौदी अरेबियाचे राजे सलमान रशियाच्या दौ-यावरआगमन होणार त्याचवेळी जाम गोचीमध्यपूर्वेतील राजकारणाला नवी दिशा

मॉस्को : सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ गेल्या बुधवारपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौ-यावर होते. रशियात त्यांचे आगमन होणार त्याचवेळी त्यांची जाम गोची झाली. 81 वर्षीय राजे सलमान बिन अब्दुलअझीझ रशियातील मॉस्को विमानतळावर त्यांच्या शाही विमानातून एस्कलेटरद्वारे उतरत होते. त्यावेळी काही तांत्रिक कारणामुळे सोन्याचा मुलामा असलेले हे एस्कलेटर अर्ध्यावर बंद पडले. बंद पडल्यानंतर राजेंना किंचित धास्ती भरली अन् कावरेबावरे झाले. त्यानंतर शांतपणे एस्कलेटरमधील बिघाड दूर होईल, याकडे पाहत होते. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या सहका-यांने त्यांना सावरत हाताला धरुन एस्कलेटरवरुन विमातळावर उतरविले आणि त्यांनी मोकळा श्वास घेतला. याचबरोबर, विमानतळार त्यांचे स्वागत करण्यासाठी रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोजिन आणि लष्काराचे बॅंड पथक उपस्थित होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात इतका व्हायरल झाला आणि नेटिझन्सच्या प्रतिक्रियांचा अक्षरश: पूर आला.  

सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ यांच्यासोबत सौदीहून जवळपास 1,000 लोकांचे शिष्टमंडळ रशियात दाखल झाले. त्यांच्या राहण्याची सोय येथील क्रेमलिनमध्ये असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आल्याची माहिती, येथील मीडियाने दिली आहे. 

मध्यपूर्वेतील राजकारणाला नवी दिशाराजे सलमान बिन अब्दुलअझीझ हे सौदीच्या सत्तेवर असताना रशियाला भेट देणारे पहिले राजे आहेत. या भेटीमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी मध्यपुर्वेत आपले संबंध बळकट करण्याचे प्रयत्न केले आहेत. सौदी अरेबिया आजवर विमानांची खरेदी इंग्लंड आणि अमोरिकेकडून करत होता. मात्र, रशियाच्या भेटीत सौदीने रशियाकडून एस-400 डिफेन्स सिस्टिम घेण्याचे निश्चित केले आहे. तसेच, या भेटीला दोन्ही देशांनी ऐतिहासिक असे संबोधून दोन्ही देशांचे संबंध बळकट होतील अशी अपेक्षा केली आहे. सीरियामध्ये अध्यक्ष बशर अल असद यांच्याविरोधात लढणा-या बंडखोरांच्या बाजूने सौदी अरेबिया तर असद यांना रशिया मदत करत आहे. मध्यपूर्वेत इराणचे वाढते बळ ही सौदीला त्रासदायक वाटत आहे, अशा स्थितीत राजे सलमान व व्लादिमिर पुतीन यांच्या चर्चेत सीरियावर काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

टॅग्स :king salman bin abdulazizराजे सलमान बिन अब्दुलअझीझ