शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Kim-Trump Summit : ऐतिहासिक दिवस…. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली किम जोंग उन यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 11:45 IST

या ऐतिहासिक भेटीचे छायाचित्र टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी एकच गर्दी केली होती. 

सिंगापूर :  संपूर्ण जगाचे लक्ष लागून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची भेट सिंगापूरमध्ये सेंटोसा बेटावर  झाली.  सिंगापूरमधील हॉटेल कॅपेलामध्ये ही भेट झाली. या भेटीत दोघांनी सुमारे 50 मिनिटं एकमेकांशी चर्चा केली. या ऐतिहासिक भेटीत दोघामध्ये काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांनी हस्तांदोलन करत बैठकीला सुरुवात केली.  या ऐतिहासिक भेटीचे छायाचित्र टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी एकच गर्दी केली होती. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने उत्तर कोरियातील सर्वोच्च नेत्याची भेट घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन, व्हाइट हाउसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स व व्हाइट हाउसचे प्रमुख अधिकारी जॉन केली हे आलेत तर किम जोंग उन यांच्याबरोबर मंगळवारी होणाऱ्या बैठकीतील फलनिष्पत्ती चांगलीच असेल, असा आशावाद डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्यक्त केला होता. त्रयस्थ देश या नात्याने यजमानपद करणाऱ्या सिंगापूरला या बैठकीसाठी तब्बल २० दशलक्ष सिंगापूर डॉलर खर्च आला आहे.

म्हणून ऐतिहासिक भेटीला महत्व?काही दिवसांपूर्वी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचे प्रमुखांनी भेटून सामंजस्याने चर्चाही केली होती. दरम्यान आजच्या किम-ट्रम्प भेटीने कोरियाई युद्धाला औपचारिक पूर्णविराम मिळणार आहे.  

उत्तर कोरियाचे सत्ताधीश झाल्यापासून प्रथमच सर्वात लांबचा विमान प्रवास करून किम जोंग उन एअर चायनाच्या विमानाने प्योंग्यागहून येथे पोहोेचले, तर जी-७ देशांच्या शिखर परिषदेसाठी कॅनडात गेलेले ट्रम्प थेट तेथून आले. सोमवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळात उद्याच्या चर्चेच्या तयारीसाठी अनेक बैठका झाल्या. उत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचण्या घेतल्यामुळे दक्षिण कोरिया अतिशय चिंतेत होता, तर रशियाने उत्तर कोरियावर निर्बंधघातले होते. मात्र त्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व किम यांच्या भेटीनंतर उत्तर कोरियाने एक पाऊल मागे घेतले आणि अण्वस्त्र चाचण्या बंद केल्या. तसेच प्रथमच उत्तर कोरिया व दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष एकमेकांना भेटले आणि वातावरण अधिक सुधारण्याचे दोघांत मान्य झाले.

टॅग्स :Kim-Trump Summit Singaporeकिम-ट्रम्प भेट सिंगापूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पKim Jong Unकिम जोंग उन