किम जोंग उन यांचा पहिलावहिला सेल्फी पाहिलात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 08:00 IST2018-06-12T08:00:01+5:302018-06-12T08:00:01+5:30

आतापर्यंत बंदिस्त वर्तुळात वावरणाऱ्या किम यांचा हा मोकळाढाकळा अंदाज पाहून सिंगापूरमधील लोक चकित झाले. 

Kim Jong Un Sightseeing Dictator Takes Selfies in Singapore | किम जोंग उन यांचा पहिलावहिला सेल्फी पाहिलात का?

किम जोंग उन यांचा पहिलावहिला सेल्फी पाहिलात का?

सिंगापूर- अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची ऐतिहासिक भेट मंगळवारी सकाळी पार पडली. सिंगापूरमधील सेनटोसा बेटावर भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता हे दोन्ही नेते भेटले. जागतिक शांततेच्यादृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटकांचे या भेटीकडे लक्ष लागले होते. त्यामुळे सिंगापूरमध्ये या दोन्ही नेत्यांच्या प्रत्येक हालचालीवर प्रसारमाध्यमे बारकाईने लक्ष ठेवून होती. यावेळी किम जोंग उन हे नेहमीची सुरक्षा बाजुला सारुन मोकळेपणाने वावरताना दिसले. त्यांनी सोमवारी रात्री सिंगापूरचा फेरफटका मारला. यावेळी ते स्थानिक नेत्यांशी बोलताना व त्यांच्यासोबत सेल्फी घेतानाही दिसले. आतापर्यंत बंदिस्त वर्तुळात वावरणाऱ्या किम यांचा हा मोकळाढाकळा अंदाज पाहून सिंगापूरमधील लोक चकित झाले. 

शहरात फेरफटका मारताना सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्णन यांनी किम जोंग उन यांच्यासोबत सेल्फी काढला. हा सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतआहे. किम जोंग उन यांचा हा पहिलावहिला सेल्फी असल्याचे सांगितले जाते. किम जोंग उन रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या हॉटेलमधून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. किम जोंग उन हे मरिना बे सँड्स या सिंगापूरमधील प्रतिष्ठित हॉटेलच्या ५६ व्या मजल्यावर गेले. या हॉटेलच्या ५६ व्या मजल्यावर ऑब्झर्वेशन डेक असून तिथून एका बाजूला अथांग सागर तर दुसऱ्या बाजूला सिंगापूर न्याहाळता येतो. किम जोंग उन बराच वेळ ऑब्झर्व्हेशन डेकवर थांबले होते.

Web Title: Kim Jong Un Sightseeing Dictator Takes Selfies in Singapore