शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पाकमधील हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मांतरामागे मियॉ मिट्ठूचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 18:38 IST

पाकिस्तानात जेव्हा जेव्हा हिंदू मुलींचे अपहरण करुन जबरदस्ती धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जातो अशा घटनांमागे एका व्यक्तीचा हात असल्याचं नेहमी बोललं जातं तो व्यक्ती म्हणजे मियॉ मिट्टू  

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्येहिंदू मुलींचे अपहरण करुन त्यांना जबरदस्तीने मुस्लिम बनण्यासाठी दबाव आणण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. आतापर्यंत पाकिस्तानातून 8 अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्यात आले आहे.  सिंध प्रातांतल्या या हिंदू मुलींचे अपहरण जबरदस्ती त्यांचा निकाह लावण्यात येतो. 1947 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानात अनेक हिंदुना जबरदस्तीने मुस्लिम बनण्यासाठी दबाव आणण्यात आला. अल्पवयीन मुलींना मुस्लिम बनवून त्यांच्याकडून खोटा व्हिडीओ बनविण्यात येतो त्याद्वारे या टोळीतील लोकं कायद्यापासून पळ काढतात. 

पाकिस्तानात जेव्हा जेव्हा हिंदू मुलींचे अपहरण करुन जबरदस्ती धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जातो अशा घटनांमागे एका व्यक्तीचा हात असल्याचं नेहमी बोललं जातं तो व्यक्ती म्हणजे मियॉ मिट्टू  

पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अनेकदा तेथील संसदेत प्रश्न उपस्थित झाला आहे. मियॉ मिट्ठूविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी संसदेत झाली आहे. मात्र तरीही पाकिस्तान सरकारकडून मियॉंवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पाकिस्तानी संसदेमध्ये या प्रकरणावरुन सत्ताधारी पक्षाचे खासदार डॉ. रमेश कुमार वाकवानी यांनी हिंदुवरील अत्याचाराविरोधात संसेदत प्रश्न मांडले आहेत. 

पाकिस्तानात हिंदुंवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. हळूहळू पाकिस्तानात हिंदुच्या मंदिरांवर लक्ष्य केले जात आहे. दरवर्षी पाकिस्तानात 300 हिंदू मुलींचे अपहरण करण्यात येते असं एका अहवालावरुन दिसून येते. 

कोण आहे हा मियॉ मिट्ठू ?पाकिस्तानात हिंदुच्या विरोधात सर्वात जास्त गरळ ओकणारा नेता पीपल्स पार्टीचे माजी खासदार पीर अब्दुल हक यांना मियॉ मिट्ठू नावाने ओळखतात 

पाकिस्तानातील हिंदुचे धर्मांतर करण्यासाठी मियॉ यांचा पुढाकार असतो. अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन धर्मांतर करण्यासाठी मियॉ प्रसिद्ध आहेत. 2016 च्या आकडेवारीनुसार मिया मिट्ठू याच्याविरोधात 117 गुन्हे नोंद आहेत. 

पाकिस्तानात अनेक वेळा हिंदू लोकांनी मियॉ मिट्ठूविरोधात रस्त्यावर येऊन आंदोलने केली आहेत. हिंदू लोकांनी मियॉ मिट्ठू यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. पाकिस्तानात कट्टर इस्लामचा प्रचार मियॉं मिट्टू उघड करतात.

मियॉ मिट्ठू यांचे फोटो पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान, पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यासोबत आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदूMuslimमुस्लीमIndiaभारतImran Khanइम्रान खान