शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Video : लंडनमध्ये खलिस्तानी समर्थकांचा भारतीयांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 15:11 IST

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने लंडनमधील खलिस्तानी समर्थकांना हाताशी घेऊन भारतीयांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने लंडनमधील खलिस्तानी समर्थकांना हाताशी घेऊन भारतीयांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आयएसआयचे समर्थक असलेल्या खलिस्तानी लोकांनी भारताच्या उच्च आयुक्तालयासमोर पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या भारतीय लोकांवर हल्ला केला.ओवरसीज पाकिस्तानी वेलफेअर काउंसिल (ओपीडब्ल्यूसी) आणि शीख फॉर जस्टिस गट, आणि ब्रिटन फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटीमधील लोकांमध्ये वाद झाला.

लंडन - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. यामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने लंडनमधील खलिस्तानी समर्थकांना हाताशी घेऊन भारतीयांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आयएसआयचे समर्थक असलेल्या खलिस्तानी लोकांनी भारताच्या उच्च आयुक्तालयासमोर पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या भारतीय लोकांवर हल्ला केला आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आयएसआयच्या समर्थक असलेल्या काही लोकांनी शनिवारी (9 मार्च) भारताच्या उच्च आयुक्तालयासमोर घोषणाबाजी करणाऱ्या मूळचे भारतीय असलेल्या लोकांवर हल्ला केला. काश्मिरी आणि खलिस्तानी समर्थक संघटनांचे लोक भारताविरोधी घोषणाबाजी करत होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. परंतु, चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. ओवरसीज पाकिस्तानी वेलफेअर काउंसिल (ओपीडब्ल्यूसी) आणि शीख फॉर जस्टिस गट, आणि ब्रिटन फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटीमधील लोकांमध्ये वाद झाला.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. तब्बल 48 वर्षांनी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून ही कारवाई केली. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भेदरला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. 48 वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हवाई दलाच्या जवानांनी ओलांडली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी 1971 साली अशी कारवाई केली होती आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र झाला होता.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानLondonलंडन