शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

संबंधात समस्या येत असल्याने व्यक्तीने कापला स्वत:चा प्रायव्हेट पार्ट, डॉक्टरांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 14:44 IST

प्रायव्हेट पार्ट कापण्यामागे वैवाहिक जीवनातील समस्या असल्याचं समजत आहे. त्याच्या परिवाराला या घटनेची माहिती साधारण १६ तासानंतर लागली.

केनियामध्ये (Kenya) मानसिक रूपाने आजारी ४५ वर्षीय एका व्यक्तीने किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या चाकूने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट (Choppes off his private part) कापला. असं सांगितलं जात आहे की, या व्यक्तीने बऱ्याच दिवसांपासून औषध घेणं बंद केलं होतं. सुदैवाने डॉक्टर त्याचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले.

प्रायव्हेट पार्ट कापण्यामागे वैवाहिक जीवनातील समस्या असल्याचं समजत आहे. त्याच्या परिवाराला या घटनेची माहिती साधारण १६ तासानंतर लागली. त्यानंतर त्याला कसंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अशा केसेसमध्ये जर कुणी अशाप्रकारे आत्महत्येच्या उद्देशाने आपलं लिंग कापण्याचा प्रयत्न करत असेल, तर याला फालसीसाइड म्हणून ओळखलं जातं.

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, रूग्णाला घटनेनंतर १६ तासांनी आणण्यात आलं होतं. त्यांनी हेही सांगितलं की, परिवारातील लोक रूग्णाचा कापलेला अवयवही घेऊन आले होते. डॉक्टरांनी सांगितलं की, ही व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यात येणाऱ्या समस्येमुळे हैराण होता. त्यामुळे यावरून सतत चिंतेत राहणाऱ्या या व्यक्तीने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारच्या जखमांच्या केसेस दुर्मीळ असतात.  

ही संपूर्ण घटना एका मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे. यात पीडित व्यक्तीचं नाव किंवा त्याचा पत्ता देण्यात आला नाही. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, आधीतर डॉक्टरांनी त्याच्या कापलेल्या अवयवाला जोडण्याचा निर्णय घेतला. पण तो अवयव कापून बराच उशीर झाला होता आणि योग्यप्रकारे तो ठेवण्यात आला नसल्याने त्यांना आपला निर्णय बदलावा लागला. डॉक्टर केवळ असेच अवयव पुन्हा जोडू शकतात, जे संक्रमित  नसतील.

डॉक्टरांनी सांगितलं की, त्याचा कापलेला अवयव साधारण १६ तासांपर्यंत असाच पडून होता. अशात तो संक्रमित झाला असण्याची शक्यता जास्त होती. जर डॉक्टरांनी जबरदस्ती तो अवयव जोडला असता तर पीडित व्यक्तीचे इतर अवयव संक्रमित झाले असते. त्याच्या मूत्रमार्गाचं नुकसान झालं असतं. रक्ताची कमतरता किंवा सेप्सिसच्या कारणामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकला असता.

डॉक्टरांनी हे सांगितलं नाही की, रूग्णाच्या शरीरातून किती रक्त वाहून गेलं होतं आणि रक्त कसं थांबवण्यात आलं होतं. नजोरोमधील एगर्टन विश्वविद्यालयातील सर्जन यूरोलॉजी केस रिपोर्टमध्ये लिहिलं की, रूग्णाने बऱ्याच दिवसांधी आपली औषध घेणं थांबवलं होतं.   

टॅग्स :kenyaकेनियाJara hatkeजरा हटके