केनियाच्या किनारी भागातील क्वाले येथे एका विमानाला अपघात झाल्याची माहिती केनियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मसाई मारा राष्ट्रीय राखीव क्षेत्रातील एका लोकप्रिय पर्यटन स्थळाकडे जात असताना हे विमान कोसळले. या अपघातात विमानातील सर्व १२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
केनियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात डायनी हवाई पट्टीपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात झाला. विमानातील १२ जणांची नेमकी स्थिती काय आहे? याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, मृतांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.
क्वाले काउंटी कमिशनर स्टीफन ओरिंडे यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, "अपघातस्थळी तात्काळ शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या बचावकार्याचे तपशील लवकरच जाहीर केले जातील." केनिया नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या घटनेला दुजोरा दिला असून, विमानात एकूण १२ जण होते. या अपघागाचे नेमके कारण काय होते? याचा तपास अधिकारी करत आहेत.
Web Summary : A plane crashed in Kwale, Kenya, en route to Maasai Mara, a popular tourist destination. All 12 people on board are feared dead. Search and rescue operations are underway to confirm the casualties and investigate the cause of the accident near Diani airstrip.
Web Summary : केन्या के क्वाले में मासाई मारा जा रहा एक विमान दुर्घटनाग्रस्त हो गया। विमान में सवार सभी 12 लोगों की मौत की आशंका है। डायनी हवाई पट्टी के पास दुर्घटनास्थल पर खोज और बचाव कार्य जारी है। हादसे के कारणों की जांच की जा रही है।