डॉक्टरांसह Amref च्या मेडिकल टीमला घेऊन जाणारे विमान कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी घडली. या घटनेत दोन डॉक्टरांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नैरोबीला लागून असलेल्या नागरी वस्तीतच हे विमान कोसळले. यात दोन नागरिकांचाही मृत्यू झाला.
Amref Health Africa या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्थेचे पथक विमानातून चालले होते. या विमानाने नैरोबीवरून उड्डाण केले, पण त्यानंतर काही क्षणातच ते कोसळले. हे विमान सोमलीलँडला निघाले होते. वीहोकोमध्ये ते कोसळले.
किआम्बू काऊंटीचे आयुक्त हेनरी वफुला यांनी सांगितले की, या विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन डॉक्टर, दोन परिचारिका आणि २ नागरी वस्तीतील लोकांचा समावेश आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
Amref ही केनियामध्ये अशासकीय संस्था आहे. ही संस्था आफ्रिकन देशात आरोग्य सेवा पुरवण्याचे काम करते. आफ्रिकेतील आरोग्य क्षेत्रात काम करणारी ही एक प्रमुख संस्था आहे. अपघातानंतर या संस्थेने म्हटले आहे की, आपतकालीन मदत पथके पाठवली असून, सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहोत.