काश पटेल यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ, FBI च्या संचालक पदाची सूत्रे भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 07:54 IST2025-02-22T07:53:06+5:302025-02-22T07:54:35+5:30
वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊस परिसरात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. काश पटेल यांच्याबरोबरच पॅम बॉन्डी यांनी अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पदाची शपथ देण्यात आली.

काश पटेल यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ, FBI च्या संचालक पदाची सूत्रे भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हाती
Kash Patel FBI Director: भारतीय वंशाचे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासातील काश पटेल यांनी शनिवारी अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (federal bureau of investigation) संचालकपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांना संचालकपदाची शपथ देण्यात आली. काश पटेल यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून पदाची शपथ घेतली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊस परिसरात असलेल्या आयजनहॉवर प्रशासकीय कार्यालय इमारतीमध्ये हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. याच कार्यक्रमात अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पदाची पॅम बॉन्डी यांनी शपथ घेतली.
#WATCH वाशिंगटन: काश पटेल ने संघीय जांच ब्यूरो (FBI) के 9वें निदेशक के रूप में भगवद गीता पर हाथ रखकर शपथ ली।
— ANI_HindiNews (@AHindinews) February 21, 2025
(सोर्स: यूएस नेटवर्क पूल वाया रॉयटर्स) pic.twitter.com/RqVLYZxHCF
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काश पटेल यांची स्तुती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांच्या नियुक्तीबद्दल स्तुती केली. एफबीआय एजंट्समध्ये ते लोकप्रिय आहे, असे ट्रम्प म्हणाले.
'काश पटेल मला यामुळे आवडतात आणि या पदावर नियुक्ती करण्याची इच्छा होती, कारण एफबीआयचे एजंट्स त्यांचा खूप आदर करतात. यावर काम करणारे ते आतापर्यंतचे सर्वात चांगले व्यक्ती म्हणून सिद्ध होतील. त्यांची नियुक्ती करणे खूप सोपी प्रक्रिया होती. ते दृढनिश्चयी आणि कणखर आहेत', अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांचं कौतुक केलं.
काश पटेलांच्या नियुक्तीला ५१-४९ मतांनी मंजुरी
काश पटेल यांच्या नियुक्तीला अमेरिकेच्या सीनेटने ५१-४९ मतांनी मंजुरी दिली. महत्त्वाचं म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या दोन प्रतिनिधींनी काश पटेल यांच्या नियुक्तीला विरोध केला. सुसान कॉलिन्स आणि लिसा मुर्कोव्स्की यांनी डेमोक्रटिक पक्षाला साथ देत काश पटेल यांच्या विरोधात मतदान केले.
एफबीआयच्या संचालकांचा कार्यकाळ १० वर्षांचा असतो, जेणेकरून त्यात राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही. पण, काश पटेल आणि ट्रम्प यांच्यातील जवळीकतेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. सीनेटर अॅडम शिफ यांनी म्हटले आहे की, एफबीआयकडे ट्रम्प यांनी त्यांचे खासगी लष्कर म्हणून बघितले नाही पाहिजे.