शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Hijab Controvercy: 'धार्मिक पोशाखांच्या परवानगीबाबत कर्नाटकनं ठरवू नये'; हिजाब प्रकरणात आता अमेरिकेची उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 16:34 IST

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घालणं हे धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. 

नवी दिल्ली: कर्नाटकातून सुरु झालेल्या हिजाब वादावरुन राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटू लागले आहेत. कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवरून निर्माण झालेल्या वादावर आता अमेरिकेने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घालणं हे धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. 

यूएस सरकारमधील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याचे राजदूत रशाद हुसैन म्हणाले की, धार्मिक स्वातंत्र्यामध्ये लोकांना त्यांचे धार्मिक कपडे निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. भारतातील धार्मिक पोशाखांना परवानगी द्यायची की, नाही हे कर्नाटक राज्यानं ठरवू नये. शाळांमधील हिजाबवरील बंदी धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करत असून महिला, मुलींकडं सरकार दुर्लक्ष करत आहे, असं रशाद हुसैन यांनी म्हटलं आहे.  

कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही याचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक देशांकडून यासंदर्भात प्रतिक्रिया येत आहेत. याबाबात भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कर्नाटकातील काही शैक्षणिक संस्थां मधील ड्रेसकोडवर काही देशांनी टीका-टिप्पणी सुरु केली आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने खडे बोल सुनावले आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयात या प्रकरणाची छाननी सुरु आहे. मात्र, अशावेळी देशाच्या अंतर्गत मुद्द्यांवर इतर कोणत्याही देशाची टीका खपवून घेतली जाणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा डाव-

११ फेब्रुवारीच्या आयबी अलर्टनुसार पन्नूने भारतीय मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. हिजाबवर लावलेली बंदी उद्या अजान आणि कुराणवर लावली जाईल. त्यासाठी विरोध करण्याची वेळ आता आली आहे. भारताला उर्दुस्तान बनवा. मुस्लिमांचा वेगळा देश बनवलेल्या पाकिस्तानकडून शिका असं त्याने म्हटलं आहे. 

हिजाब वादाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फंडिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस आणि सर्व एजन्सीला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिजाब रेफरेंडमसाठी एक वेबसाईट बनवण्यात आली आहे. त्यात लोकांना ऑनलाईन सपोर्ट करण्यासाठीही सांगितले जात आहे. या सर्व योजनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चा हात असल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणेने दावा केला आहे.

काय आहे हिजाबचा वाद?

कर्नाटकातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवरुन गोंधळ सुरू आहे. कर्नाटकातील एका कॉलेजचा व्हिडिओ समोर आला होता. जिथे एक मुलगी हिजाब घालून कॉलेजमध्ये असताना विद्यार्थ्यांच्या जमावाने मुलीसमोर जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर, मुलगीही अल्लाहू अकबरचा नारा देत उत्तर देते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. 

हिजाब वादाचे पडसाद पाकिस्तानातही उमटले-

हिजाब वादाचे पडसाद पाकिस्तानातही उमटले आहेत. नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मुलींना अशा प्रकारे हिजाब घालून प्रवेश करण्यापासून रोखणे भयावह असल्याचे तिने म्हटले. मलालाने ट्विट करून लिहिले - हिजाब परिधान केलेल्या मुलींना शाळेत प्रवेश करण्यापासून रोखणे हे भयानक आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना दुर्लक्षित करणे थांबवावे.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतKarnatakकर्नाटक