'कमला हॅरिसने कायदा मोडला, तिच्यावर खटला दाखल करायला हवा', ट्रम्प आता का संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:52 IST2025-07-27T14:52:01+5:302025-07-27T14:52:29+5:30

Donald Trump Allegations on Kamala Harris: डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

'Kamala Harris broke the law, she should be sued', why is Trump angry now? | 'कमला हॅरिसने कायदा मोडला, तिच्यावर खटला दाखल करायला हवा', ट्रम्प आता का संतापले?

'कमला हॅरिसने कायदा मोडला, तिच्यावर खटला दाखल करायला हवा', ट्रम्प आता का संतापले?

Donald Trump Allegations on Kamala Harris: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ट्रम्प यांनी आरोप केला की, २०२४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान कमला हॅरिस यांनी गायिका बेयॉन्से, टीव्ही स्टार ओप्रा विन्फ्रे आणि सामाजिक कार्यकर्ते अल शार्प्टन यांसारख्या प्रमुख व्यक्तींना पाठिंबा देण्याच्या बदल्यात पैसे दिले होते. हे एक गंभीर कायदेशीर उल्लंघन असून, याविरोधात खटला चालवला पाहिजे.

ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' वर काय लिहिले?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' वर ट्रम्प यांनी लिहिले, "जर नेते त्यांच्या मोहिमेसाठी पाठिंबा खरेदी करू लागले, तर ते लोकशाहीसाठी किती धोकादायक असेल, याची कल्पना करा? हॅरिस आणि त्यांच्या साथीदारांनी मोहिमेला पाठिंबा देण्याच्या बदल्यात लाखो डॉलर्स खर्च केले, जे अमेरिकेच्या निवडणूक कायद्यांच्या विरोधात आहे," असा आरोप ट्रम्प यांनी केला. 

जेफ्री एपस्टाईन प्रकरणावरून ट्रम्प वादात
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प स्वतः सध्या कुप्रसिद्ध जेफ्री एपस्टाईन प्रकरणावरुन वादात आहेत. या प्रकरणात, ट्रम्प म्हणतात की, तपास राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि लक्ष विचलित करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्ष हा मुद्दा उपस्थित करत आहे.

ट्रम्प यांचा मोठा दावा 
ट्रम्प यांनी असाही दावा केला की, त्यांचे गेल्या सहा महिने अमेरिकेच्या इतिहासातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षापेक्षा चांगले होते आणि 'डावे डेमोक्रॅट' हे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी एपस्टाईन प्रकरणाला "रशियन कटासारखा आणखी एक घोटाळा" म्हटले. ट्रम्प यांनी अ‍ॅटर्नी जनरल पाम बोंडी यांना जेफ्री एपस्टाईन आणि घिसलेन मॅक्सवेल यांचे ग्रँड ज्युरीचे निवेदन सार्वजनिक करण्याचे आवाहन केले. 

Web Title: 'Kamala Harris broke the law, she should be sued', why is Trump angry now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.