काबुल स्फोटात सात ठार, ३२७ जखमी

By Admin | Updated: April 19, 2016 13:46 IST2016-04-19T10:31:12+5:302016-04-19T13:46:45+5:30

पुली महमूद खान परिसरात मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटात सातजण ठार झाले असून, ३२७ जण जखमी झाले आहेत.

In Kabul blast, seven dead and 327 injured | काबुल स्फोटात सात ठार, ३२७ जखमी

काबुल स्फोटात सात ठार, ३२७ जखमी

>ऑनलाइन लोकमत - 
काबूल, दि. १९ - पुली महमूद खान परिसरात मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटात सातजण ठार झाले असून, ३२७ जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचं जवळ असलेल्या अमेरिकी दुतावासातून दिसत आहे. स्फोटामुळे अमेरिकी दुतावासाला मात्र कोणतच नुकसान झालेलं नाही. नाटोचे मुख्यालयदेखील जवळ आहे. मुख्यालयदेखील सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. स्फोट नेमका कसा झाला ? याची नेमकी माहिती अजून मिळू शकलेली नाही. पण शहरावर रॉकेट हल्ले नेहमी होत असतात त्यामुळे हा रॉकेट हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 

Web Title: In Kabul blast, seven dead and 327 injured