शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

न्या. भंडारी यांच्या फेरनिवडीने भारताच्या मुत्सद्दीगिरीचा विजय, नऊ वर्षे पदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 4:10 AM

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारताचे उमेदवार न्या. दलवीर भंडारी यांची आणखी नऊ वर्षांसाठी मंगळवारी फेरनिवड झाली.

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारताचे उमेदवार न्या. दलवीर भंडारी यांची आणखी नऊ वर्षांसाठी मंगळवारी फेरनिवड झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या राजनैतिक मुत्सद्दीगिरीचा हा मोठा विजय मानला जात असून, त्याबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री यांनी न्या. भंडारी व संयुक्त राष्ट्रांतील भारतीय प्रतिनिधींचे अभिनंदन केले.आंतरराष्ट्रीय न्यायालयातील १५पैकी ५ न्यायाधीशांची मुदत संपल्याने त्या जागांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा आणि सुरक्षा परिषदेत एकाच वेळी मतदान घेण्यात आले. ब्रिटनचे उमेदवार न्या. ख्रिस्तोफर ग्रीनवूड आणि न्या. भंडारी यांच्यात लढत अपेक्षित होती. परंतु भारताच्या मुत्सद्दीगिरीमुळे न्या. भंडारी यांचे पारडे जड असल्याचे जाणवताच ब्रिटनने न्या. ग्रीनवूड यांची उमेदवारी ऐनवेळी मागे घेतली. परिणामी, महासभेत १९३पैकी १८३ व सुरक्षा परिषदेत सर्व १५ मते मिळवून ७० वर्षांचे न्या. भंडारी सहज विजयी झाले.या निवडणुकीसाठी पडद्यामागून सूत्रे हलविणारे भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दिन यांनी न्या. भंडारी यांच्या विजयाबद्दल खास स्वागत समारंभ आयोजित करून आनंद साजरा केला.ब्रिटनचे युनोतील प्रतिनिधी मॅथ्यु रायक्रॉफ्ट यांनी न्या. भंडारी यांचे अभिनंदन करत आम्हाला आनंद असल्याचे म्हटले. हेरगिरीवरून पकडून पाकने फाशीची शिक्षा ठोठावलेले कुलभूषण जाधव यांचे प्रकरण या कोर्टात आहे. (वृत्तसंस्था)>न्या. भंडारी यांची निवड ही भारतीय राजनैतिक मुत्सद्दीगिरीत मैलाचा दगड ठरावी अशी घटना आहे.- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती>भारताच्या दृष्टीने हा अभिमानाचा क्षण आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व त्यांच्या चमूने केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले.- नरेंद्र मोदी>आंतरराष्ट्रीय न्यायालयातील निवडणुकीत भारताचा विजय झाला. जय हिंद! संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दिन यांचे विशेष अभिनंदन.- सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री>कसे असतेहे न्यायालय?सदस्य देशांमधील वाद सोडविण्याचे संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य न्यायिक अंग.सन १९४५मध्ये स्थापना.एकूण १५ न्यायाधीशांची आमसभा व सुरक्षा परिषदेकडून निवड.न्यायाधीशांची मुदत एका वेळी नऊ वर्षे. फेरनिवडीस पात्र.न्यायाधीशांमधून अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड.त्यांची मुदत प्रत्येकी तीन वर्षे

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालय