शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडच्या बेडरूमवर पडून असलेल्या प्रियकरानं कमावले १० अब्ज रुपये; संपूर्ण जग चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 15:42 IST

तरुण रातोरात झाला कोट्यधीश; जगात लॉकडाऊन सुरू असताना संकटात शोधली संधी

गर्लफ्रेंडच्या घरी लॉकडाऊनमुळे अडकलेल्या तरुणानं तिच्या घरातून तब्बल १० अब्ज रुपयांची कमाई केली आहे. संपूर्ण जगात या अब्जाधीशाच्या कामाची चर्चा आहे. गर्लफ्रेंडच्या घरी बिछान्यावर पडून तरुणानं १० अब्ज कसे काय कमावले असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

एका ऍपमुळे रातोरात कोट्यधीश झालेल्या तरुणाचं नाव आहे जॉनी बपफारहाट. एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऍपच्या माध्यमातून जॉनीनं लॉकडाऊनमध्ये बक्कळ कमाई केली. आता जॉनीचा समावेश इंग्लंडमधील श्रीमंत तरुणांमध्ये होते. २०२० मध्ये संपूर्ण जगात कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. त्यावेळी बरेचसे लोक वर्क फ्रॉम होम करायचे. लोकांची गरज लक्षात घेऊन जॉनीनं हॉपिन नावाचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऍप तयार केलं. विशेष म्हणजे त्यावेळी जॉनी गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता. तिच्या बेडरूममध्ये बिछान्यावर लोळत असताना त्याला हॉपिनची कल्पना सुचली.

जॉनीनं सर्वात आधी या ऍपसाठी भांडवल गोळा केलं. त्यानंतर ऍपच्या माध्यमातून जबरदस्त कमाई केली. जॉनीनं मॅनचेस्टर  विद्यापीठातून पदवी घेतली आहे. २०१८ मध्येच त्याला ऍपची कल्पना सुचली होती. मात्र त्यावेळी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. २०१८ मध्ये गर्लफ्रेंडच्या बेडरुममध्ये बिछान्यावर पडला असताना त्यानं ऍपसाठी कोडिंग केलं. हॉपिन ऍप झूमप्रमाणेच काम करतं. या माध्यमातून व्हिडीओ कॉल्स करता येतात.

हॉपिन लॉन्च झाल्यानंतर वर्षभरात वापरकर्त्यांची संख्या ५० लाखांच्या पुढे गेली. त्यामुळे ऍपचं मूल्य ४ खर्व १२ अब्ज ४६ कोटी ७९ लाख ५७ हजारांवर गेलं. यामुळे जॉनी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ११३ व्या स्थानी पोहोचला. जॉनीनं आता कंपनीतील त्याच्या मालकीचे काही स्टॉक विकले. त्यातून त्याला १० अब्ज रुपये मिळाले.