शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

जो बायडन अतिशय कमकुवत राष्ट्राध्यक्ष, युद्धाचीही शक्यता; चीनच्या सल्लागारांची टीका

By मोरेश्वर येरम | Published: November 23, 2020 3:23 PM

जो बायडन अध्यक्ष झाल्यामुळे अमेरिकेसोबतचे चीनचे संबंध सुधारतील अशी अपेक्षा चीन सरकारने ठेवू नये.

ठळक मुद्देआगामी काळात अमेरिका-चीन युद्धाची शक्यता वर्तविण्यात आलीयबायडन यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे चीनसोबतचे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यताचीनने अमेरिकेकडून घेतल्या जाणाऱ्या कठोर निर्णयांसाठी तयार राहावं, चीनच्या सल्लागारांचं मत

बीजिंगअमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे अतिशय कमकुवत राष्ट्राध्यक्ष असल्याची टीका चीनच्या सरकारचे सल्लागार झेंग योंननियान यांनी केली आहे. 

जो बायडन अध्यक्ष झाल्यामुळे अमेरिकेसोबतचे चीनचे संबंध सुधारतील अशी अपेक्षा चीन सरकारने ठेवू नये. बायडन यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर चीनने कठोर निर्णयांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा झेंग योंननियान यांनी दिला आहे.

इतकंच नव्हे, तर अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध आगामी काळात बिघडू शकतात. त्यामुळे उभय देशांमध्ये युद्धदेखील होऊ शकतं, असंही ते पुढे म्हणाले. झेंग योंननियान सध्या 'अॅडवान्स इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल अँड कंटेंम्पररी चायना स्टडीज या संस्थेचे' डीन म्हणून काम पाहातात. दीर्घकालीन धोरण ठरविण्यासाठी झेंग हे चीन सरकारची मदत करतात.

जो बायडन अमेरिकेतील जनतेच्या भावनांच्या फायदा उठवू शकतात. पण अमेरिकेतील समाज दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. त्यामुळे बायडन काही करू शकणार नाहीत, असं झेंग म्हणाले. 

'बायडन हे अतिशय कमजोर नेते असून ते अमेरिकेतील अंतर्गत मुद्दे देखील सोडवू शकणार नाहीत. ट्रम्प हे लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या विरोधात असतात असं जरी आपण मानलं तरी ते युद्ध करण्याठी तयार झाले नसते. पण डेमोक्रॅटीक पक्षाचे अध्यक्ष युद्ध पुकारू शकतात', असं रोखठोक मत झेंग यांनी यावेळी व्यक्त केलं.

ट्रम्प यांच्या कालखंडात अमेरिका आणि चीनमधील संबंध विविध कारणांमुळे ताणले गेले. यात कोविड-१९ चा उद्रेक, व्यापार आणि मानवी हक्क या गोष्टींचा समावेश आहे. अमेरिकेत डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन या दोघांकडूनही चीनला लक्ष्य करणारी जवळपास ३०० अधिक विधेयकं आजवर मंजुर झाली आहेत. चीनच्या परराष्ट्र धोरणकर्त्यांनीही आगामी काळात बायडन यांच्या अध्यक्षतेतही चीन आणि अमेरिकेतील संबंध हे असेच तणावपूर्ण राहतील असा अंदाज व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याXi Jinpingशी जिनपिंग