जो मेरा, वो तेरा...! कंगाल पाकिस्तानची भारताविरोधात बांगलादेशला अजब ऑफर, जाणून हसू आवरणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:48 IST2024-12-05T14:47:19+5:302024-12-05T14:48:11+5:30
पाकिस्तान तर आधीपासूनच भारताचा शत्रू राहिला आहे. तो दीर्घकाळापासून आर्थिक समस्यांचे फटके खात आहे. बांगलादेशची आर्थिक स्थितीही काही फार वेगळी नाही. मात्र सध्या दोन्ही देशांची भारताविरोधात चुळबूळ सुरू असल्याचे दिसत आहेत.

जो मेरा, वो तेरा...! कंगाल पाकिस्तानची भारताविरोधात बांगलादेशला अजब ऑफर, जाणून हसू आवरणार नाही!
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यापासून तेथील हिंदूंवरील अत्याचारात सातत्याने वाढताना दिसत आहेत. यावर भारतानेही कठोर भूमिका दर्शवली आहे. पाकिस्तान तर आधीपासूनच भारताचा शत्रू राहिला आहे. तो दीर्घकाळापासून आर्थिक समस्यांचे फटके खात आहे. बांगलादेशची आर्थिक स्थितीही काही फार वेगळी नाही. मात्र सध्या दोन्ही देशांची भारताविरोधात चुळबूळ सुरू असल्याचे दिसत आहेत.
भारताकडून गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशला साखर, भाजीपाला, धान्य, डाळी आदींची निर्यात होत होती. मात्र हिंदूंवरील हिंसाचाराची संपूर्ण जगात चर्चा झाल्यानंतर, आता बांगलादेशने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूजनुसार, बांगलादेशने पाकिस्तानातून 25,000 टन साखर आयात केली आहे. एवढेच नाही, तर बांगलादेश लष्कराला लागणाऱ्या दारूगोळ्यासाठीही त्यांनी पाकिस्तानसोबत करार केला आणि याची एक खेप सागरी मार्गाने बांगलादेशाला पोहोचली देखील आहे.
अता अणुबॉम्बसुद्धा देणार पाकिस्तान? -
महत्वाचे म्हणजे, कंगालीचा सामना करत असलेल्या पाकिस्तानातून बांगलादेशला मदतीचे आश्वसनही दिले जात आहेत. विशेष म्हणजे, या चर्चा आता रस्त्यांवरही सुरू आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जमावाला संबोधित करताना दिसत आहे. यांतील दोघांच्या हातात पाकिस्तान आणि बांगलादेशचे झेंडेही आहेत.
"संबंधित व्यक्ती बोलत आहे की, "आज आम्ही आमच्या बंगाली बांधवांना सांगत आहोत की, भावानो हा पाकिस्तान तुमचा आहे. या पाकिस्तानचा जो अणुबॉम्ब आहे ना, तोही तुमचा आहे. जर बांगलादेशकडे कुणी डोळे वर करून बघितले, तर त्याचे डोळे काढू. अल्लाहच्या कृपेने बांगलादेशविरुद्ध कोणी हात उचलला, तर त्याचे हात तोडून टाकू. मला त्या देशाचे नाव घ्यायचे नाही."