जिल बायडेन यांना भारताकडून सर्वात महागडी भेट; दिला १७ लाख रुपये किमतीचा हिरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 09:15 IST2025-01-04T09:14:17+5:302025-01-04T09:15:38+5:30
७.५ कॅरेट वजनाचा १७ लाख रुपये किमतीचा मौल्यवान हिरा मोदी यांनी जिल यांना भेट दिला.

जिल बायडेन यांना भारताकडून सर्वात महागडी भेट; दिला १७ लाख रुपये किमतीचा हिरा
वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व त्यांच्या कुटुंबाला चार वर्षांच्या कार्यकाळात २०२३ मध्ये विदेशी नेत्यांकडून अनेक महागड्या वस्तू भेटस्वरूपात मिळाल्या. बायडेन यांच्या पत्नी व फर्स्ट लेडी जिल यांना सर्वात महागडी भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ७.५ कॅरेट वजनाचा १७ लाख रुपये किमतीचा मौल्यवान हिरा मोदी यांनी जिल यांना भेट दिला.
मिळालेल्या भेटवस्तू...
- दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष सुक योल युन यांनी दिलेला ६ लाख रुपये किमतीचा अल्बम.
- ब्रुनेईच्या सुलतानांनी दिलेले २ लाख ८३ हजार रुपयांचे चांदीचे बाउल.
- इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांकडून २ लाख ७१ हजारांची चांदीची प्लेट
- जेलेन्स्की यांच्याकडून २ लाख ५ हजार रुपये किमतीचा कोलाज.
मोदी यांनी दिलेला हिरा व्हाइट हाऊसच्या ईस्ट विंगमध्ये ठेवण्यात आला, तर इतर भेटवस्तू राष्ट्राध्यक्षांच्या संग्रहात जपून ठेवण्यात आल्या.