शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाझी भस्मासुराच्या तावडीतून वाचलेल्या ज्यूंनी शिंडलरला लिहिलेल्या पत्रांचा होणार लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 15:47 IST

जर्मन उद्योजक आणि शेकडो ज्यूंना नाझींच्या तावडीतून वाचवणाऱ्या ऑस्कर शिंडलरला लिहिलेल्या पत्रांचा लिलाव होणार आहे.

ठळक मुद्देमहायुद्धाच्या काळानंतर ऑस्कर शिंडलर आणि त्याची पत्नी एमिली 1949 साली अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथे पळून गेले. तेथे गेल्यावर पोलंडमध्ये त्याने ज्या ज्यू लोकांना आपल्या कारखान्यात काम करण्याची संधी देऊन वाचवले होते, त्या ज्यूंची त्याला कृतज्ञता व्यक्त कर

जेरुसलेम- जर्मन उद्योजक आणि शेकडो ज्यूंना नाझींच्या तावडीतून वाचवणाऱ्या ऑस्कर शिंडलरला लिहिलेल्या पत्रांचा लिलाव होणार आहे. ही पत्रे त्याने ज्या ज्यूंना वाचवले त्या लोकांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लिहिली होती. 8 डिसेंबर रोजी लॉरेन्स ऑक्शनियर्स हा लिलाव करणार आहे. 

महायुद्धाच्या काळानंतर ऑस्कर शिंडलर आणि त्याची पत्नी एमिली 1949 साली अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथे पळून गेले. तेथे गेल्यावर पोलंडमध्ये त्याने ज्या ज्यू लोकांना आपल्या कारखान्यात काम करण्याची संधी देऊन वाचवले होते, त्या ज्यूंची त्याला कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे येऊ लागली. शिंडलरने नाझी फौजांना लाच देऊन तसेच हे कामगार लष्करी साहित्य तयार करण्यासाठी आवश्यक आहेत असे दाखवून त्यांना वाचवले होते. 1200 ज्यूंचे प्राण वाचविण्यासाठी त्यांच्या औषधांच्या खर्चासाठी एमिली शिंडलरने स्वतःचे दागिने आणि कपडेही विकले होते. त्यांच्या या कामगिरीवर स्टीव्हन स्पिलबर्गने "शिंडलर्स लिस्ट" हा चित्रपटही बनवला होता. त्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. 28 एप्रिल 1908 रोजी जन्मलेला ऑस्कर शिंडलर हा जर्मन उद्योजक होता, महायुद्धाच्या काळामध्ये त्याने ज्यूंचे प्राण वाचवले होते. 9 ऑक्टोबर 1974 रोजी त्याचे पश्चिम जर्मनीमध्ये निधन झाले.  एमिली शिंडलर यांचा 2001 साली बर्लिनमध्ये वयाच्या 93व्या वर्षी मृत्यू झाला.

''मी जरी तुला प्रत्यक्षात भेटले नाही तरी तू मला मृत्युच्या तावडीतून वाचवणे हे एखाद्या विशेषाधिकार आणि सन्मानापेक्षा आजिबात कमी नव्हतं, तुला वाढदिवसाच्या आणि आरोग्यदायी आय़ुष्यासाठी शुभेच्छा असा एका पत्रातील मजकूर जेली मेल वर्तमानपत्राने प्रसिद्ध केला आहे." यावरुन शिंडलरवर हे ज्यू किती प्रेम करत असावेत हे जाणवते.''माझे मन तुझ्या धाडसी त्यागामुळे हेलावले होते. माझा माणुसकीवरचा विश्वास पुन्हा प्रस्तापित करण्यासाठी तू केलेल्या प्रयत्नांबद्दल तुझे आभार'', असेही एका पत्रात लिहिले आहे.