शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Iron Man चा अडीच कोटींचा सूट गेला चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 19:50 IST

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ मध्येही रॉबर्ट डाऊनी आयर्न मॅनच्या भूमिकेत दिसला होता.

लॉस अँजेलिस: हॉलिवूड चित्रपटांतील लोकप्रिय पात्र असलेल्या Iron Man चा सूट चोरीला गेल्याची घटना घडली आहे. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर याने 2008 साली आलेल्या चित्रपटात Iron Man चा हा सूट वापरला होता. लॉस अँजेलिस पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी चित्रपटांसाठी पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंच्या गोदामातून हा सूट गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून हा सूट शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. यासाठी गुप्तहेरांचे खातेही कामाला लागले आहे. Iron Man च्या या प्रसिद्ध सूटची किंमत साधारण 2.18 कोटी इतकी होती. 2008 मध्ये रॉबर्ट डाऊनीची प्रमुख भूमिका असलेला आयर्न मॅन प्रदर्शित झाला होता. त्यावेळी डाऊनीने हा सूट परिधान केला होता. त्यावेळी हा चित्रपट प्रचंड गाजलाही होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ मध्येही रॉबर्ट डाऊनी आयर्न मॅनच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला असून रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. फक्त १३ दिवसांत चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार करत भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूडपट ठरला आहे. पहिल्याच दिवशी ३१.३३ कोटींची कमाई करत चित्रपटाने ‘बागी २’ आणि ‘पद्मावत’चा रेकॉर्ड मोडला होता. फक्त चार दिवसातच चित्रपटाने १०० कोटींची कमाई करत आधीच रेकॉर्ड केला होता. ‘इन्फिनिटी वॉर’ हा एमसीव्हीचा फेस १ मधील शेवटचा सिनेमा आहे. या सिनेमाच्या पटकथेची सुरूवात २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आर्यनमॅन सिनेमापासून झाली. या चित्रपटानंतर ‘आर्यनमॅन’, ‘अॅवेंजर्स’, ‘थॉर’ असे एकाहून एक सरस तब्बल १५ सिनेमांमधून ‘इनफिनिटी वॉर’ची पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती. 

टॅग्स :HollywoodहॉलिवूडCrimeगुन्हाRobberyदरोडा