शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पाणबुडीनंतर घुसखोरी करणारं चिनी बॉम्बर विमान जपाननं लावलं पळवून; चीननं दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 09:19 IST

आशियात विस्तारवादी मानसिकतेत असलेला चीन आता जपानबरोबर पूर्व चीन समुद्रात हक्कासाठी भांडतो आहे.

टोकियो: लडाखमध्ये भारताशी संघर्ष करणाऱ्या चीनलाजपानने चांगला धडा शिकविला. जपानी हवाई दलात घुसलेल्या चिनी बॉम्बर विमानाचा जपानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाठलाग केला अन् त्याला पळवून लावलं. काही दिवसांपूर्वी जपानी नौदलाने अशाच प्रकारे चिनी पाणबुडीला अशाच पद्धतीनं मागे रेटलं होतं. आशियात विस्तारवादी मानसिकतेत असलेला चीन आता जपानबरोबर पूर्व चीन समुद्रात हक्कासाठी भांडतो आहे. तसेच पश्चिम प्रशांत  क्षेत्रात चीननं घुसखोरी किंवा दावा केल्यास त्या कृतीस सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. जपानी संरक्षण मंत्रालयाने केले निवेदन प्रसिद्ध जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्व चिनी समुद्रात ओकिनावा आणि मियाको जपानी बेटांदरम्यान एक चिनी एच-6  बॉम्बर विमान दिसलं आहे. त्यानंतर जपानी एफ -16 लढाऊ विमानांनी लागलीच उड्डाण करत त्या विमानाला पळवून लावलं आहे. अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम चिनी बॉम्बरचिनी एच -6 बॉम्बर दीर्घ-रेंजच्या लक्ष्यांना भेदण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे विमान अणुहल्ला करण्यासही सक्षम आहे. अमेरिकेच्या तळाला लक्ष्य करण्यासाठी चीनने हे विमान खास करून तयार केले आहे. पूर्वीच्या मॉडेलमध्ये क्षेपणास्त्रांची क्षमता मर्यादित होती, परंतु ती श्रेणी आता सुधारत गेली आहे. जपानबरोबर बेटांवर चीनची चकमक सुरूचपूर्व चीन समुद्रात असलेल्या बेटांवर चीन आणि जपानमध्ये वाद आहे. या निर्जन बेटांवर दोन्ही देशांचा दावा आहे. जपानमधील सेनकाकू आणि चीनमधील डायओस म्हणून ही बेटे ओळखली जातात. या बेटांचे मालकी हक्क 1972पासून जपानच्या हातात आहेत. त्याचबरोबर चीनचा असा दावा आहे की, ही बेटे त्याच्या अखत्यारीत आली आहेत आणि जपानने आपला दावा सोडला पाहिजे. इतकेच नाही तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षानेही ती हस्तगत करण्यासाठी सैन्य कारवाईची धमकी दिली आहे.जपानी नौदल करते बेटांचे संरक्षण जपानी नौदल सध्या सेनकाकू किंवा डायओस बेटांचे संरक्षण करते. अशा परिस्थितीत चीनने या बेटांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जपानबरोबर युद्ध करावे लागेल. जगातील तिस-या क्रमांकाची सर्वात मोठी सैन्य शक्ती असलेल्या चीनसाठी हे सोपे नाही. गेल्या आठवड्यात बरीच चिनी सरकारी जहाजं या बेटाजवळ पोहोचली होती, त्यानंतर जपान अन् चीनमध्ये बेटांवरून युद्ध भडकण्याची शक्यताही वाढली होती.जपानने भारतीय नौदलाबरोबर केला युद्धसरावजपानी नौदलाने ट्विट केले आहे की, 27 जून रोजी जपान मेरिटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्सच्या जेएस काशिमा आणि जेएस शिमयुकी यांनी हिंदी महासागरात आयएनएस राणा आणि भारतीय नौदलाचे आयएनएस कुलिश यांच्यासमवेत एक युद्धसराव केला होता. याद्वारे जपान मेरिटाईम सेल्फ-डिफेन्स फोर्सने भारतीय नौदलाबरोबरचे सहकार्य वाढविले आहे.चीन समुद्रावर चालवतोय पॉवर गेम दक्षिण चीन समुद्रातील 'कब्जा' तीव्र झाला आहे. गेल्या रविवारी चीनने दक्षिण चीन समुद्राच्या 80 जागांचे नाव बदलले. त्यापैकी 25 बेटे आणि रिफ्स आहेत, तर उर्वरित 55 पाण्याच्या पृष्ठभागावरील भौगोलिक संरचना आहेत. 9-डॅश लाइनने व्यापलेल्या समुद्राच्या काही भागांवर हे चीन दावा सांगत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हे अवैध मानले जाते. चीनच्या या हालचालींमुळे केवळ छोट्या छोट्या शेजारीच देशांचा नव्हे, तर भारत आणि अमेरिकेचा ताणही वाढला आहे.

हेही वाचा

CoronaVirus: भारतीय वैज्ञानिकांच्या लढ्याला मोठं यश! देशात कोरोनाची पहिली लस तयार; जुलैमध्ये होणार ट्रायल

CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी

आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही; शिवसेनेचा टोला

आजचे राशीभविष्य - 30 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनाचा लाभ होणार

बंपर भरती! 'या' कंपन्या भारतात देणार ४० हजारांहून जास्त रोजगार, जाणून घ्या...

टॅग्स :Japanजपानchinaचीन