शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

सत्ताकाळात जैशद्वारेच भारतात स्फोट घडवले; मुशर्रफ यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 11:54 IST

पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिया यांनी परवेझ मुशर्रफ यांची फोनवर मुलाखत घेतली. यावेळी मुशर्रफ यांनी जैशवर सरकार करत असलेल्या कारवाईचे समर्थनही केले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांनी जैश ए मोहम्मदबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानी सरकारच्या सांगण्यावरूनच मसूद अझहर याने भारतात बाँबस्फोट घडवून आणले होते असा गौप्यस्फोट केल्याने पाकिस्तान सरकार तोंडघशी पडले आहे. 

पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिया यांनी परवेझ मुशर्रफ यांची फोनवर मुलाखत घेतली. यावेळी मुशर्रफ यांनी जैशवर सरकार करत असलेल्या कारवाईचे समर्थनही केले आहे. याच संघटनेने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

मुशर्रफ म्हणाले की, मी आधीपासूनच जैशला दहशतवाद्यांची संघटना म्हणत होतो. त्यांनी माझ्यावर दहशतवादी हल्ला केला. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सरकार या संघटनेविरोधात कारवाई करत असल्याचा आपल्याला आनंद असल्याचे म्हचले आहे. ही कारवाई याआधीच व्हायला हवी होती. डिसेंबर 2003 मध्ये पाकिस्तानचमध्ये मुशर्रफ यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ते बालंबाल बचावले होते. तेव्हा त्यांनी जैशवर बंदी आणण्याचा दोनदा प्रयत्न केला होता. यावर मुशर्रफ यांनी तेव्हा काळ वेगळा होता. यामध्ये आमच्या आयएसआयचा हात होता. तेव्हा भारतासोबत जशास-तसेची भुमिका राबविली जात होती. ते पाकिस्तानात स्फोट घडवायचे म्हणून आम्ही भारतात स्फोट करायचो, असेही सांगितले. 

 

गच्छंतीनंतर मुशर्रफ यांचे पाकिस्तानबाहेर पलायनमुशर्रफ यांनी लष्करशाहीचा वापर करत 1999 मध्ये पाकिस्तानचा ताबा मिळविला होता. तेव्हा नवाझ शरीफ यांना हटविण्यात आले होते व राष्ट्रपती बनले होते. मात्र, त्यांना नऊ वर्षांनी सत्ता गमवावी लागली होती. यानंतर ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहत आहेत.

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा मुलगा हम्माद व भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ यांच्यासह बंदी घातलेल्या संघटनांच्या ४४ दहशतवाद्यांना पाकिस्तानमधील तपास यंत्रणांनी मंगळवारी अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकला अखेर हे पाऊल उचलावे लागले.

यासंदर्भात पाकचे गृहमंत्री शहरयार खान आफ्रिदी म्हणाले की, दहशतवादी संघटनांचा बीमोड करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकचे गृह सचिव आझम सुलेमान खान म्हणाले, पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या ज्या दहशतवाद्यांची नावे भारताने गेल्या आठवड्यात कळविली होती त्यात हम्माद व रौफ यांचीही नावे होती. भारताने ज्या दहशतवाद्यांचा उल्लेख केला होता, केवळ त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली असा अर्थ कोणीही काढू नये. त्या व्यतिरिक्तही अन्य संघटनांच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदIndiaभारत