शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

जॅक मा प्रकटले अन् अलीबाबाचे नशीब फळफळले; कंपनीला छप्परफाड फायदा 

By कुणाल गवाणकर | Updated: January 21, 2021 16:09 IST

अचानक गायब झालेले जॅक मा जगासमोर आल्यानं समभागाचं मूल्य वाढलं

नवी दिल्ली: चीनमधील दिग्गज उद्योगपती जॅक मा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर बऱ्याच दिवसांनंतर ते काल (बुधवारी) सर्वांसमोर आले. त्यांचा एक मिनिटापेक्षा कमी कालावधीचा व्हिडीओ समोर आला. त्यात त्यांनी चीन सरकारबद्दल कोणतंही विधान केलं नाही. चिनी सरकारच्या कारवाईमुळे मा यांचा व्यवसाय संकटात आला होता. गुंतवणूदार धास्तावले होते. त्यामुळे जॅक मा नेमके आहेत कुठे असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर मा सर्वांसमोर आल्यानं गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला आहे.बुधवारी जॅक मा एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपस्थित होते. त्यामुळे अलीबाबा समूहात गुंतवणूक केलेल्यांना मोठा दिलासा मिळाला. अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडचं बाजारातील मूल्य ५८ अब्ज डॉलरनं वाढली आहे. मा गेल्या वर्षाच्या अखेरपासून बेपत्ता होते. ते नेमके कुठे आहेत याची माहिती कोणालाही नव्हती. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यानं चर्चांना उधाण आलं. जॅक मा यांना तुरुंगात धाडण्यात येईल, चिनी सरकार त्यांच्या कंपन्यांवर कब्जा करेल, अशा शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवल्या जात आहेत. मात्र मा काल जगासमोर आल्यानं या शक्यता मावळल्या आहेत. सरकारच्या परवानगीनं होत असलेल्या परिषदेत मा उपस्थित होते. सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं. मा जगासमोर येताच अलीबाबाच्या समभागांचं मूल्य ८.५ टक्क्यांनी वधारले. त्यामुळे अलीबाबाचं बाजारमूल्य ५८ अब्ज डॉलरनं वाढलं. जॅक मा यांच्याबद्दल सरकार पुढे कोणतं पाऊल उचलेल, हे आताच सांगता येणार असं चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगचे प्राध्यापक फेंग केचेंग यांनी सांगितलं. मात्र मा यांच्याविरोधात चिनी सरकार फार मोठी कारवाई करणार नसल्याचं सध्या तरी दिसत आहे. मा यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये वित्तीय नियामक संस्था आणि सरकारी कंपन्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर मा यांच्या अडचणी वाढल्या. मा अचानक गायब झाले. त्यामुळे जिनपिंग सरकारला अनेक प्रश्न विचारले गेले. 

टॅग्स :Jack Maजॅक माAlibabaअलीबाबा