थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 20:24 IST2025-08-20T19:16:48+5:302025-08-20T20:24:38+5:30
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारत काही केल्या अमेरिकेसोबत मांसाहारी दुधाची आणि शेती उत्पादनांची डील करत नाहीय म्हणून ट्रम्प थयथयाट करत आहेत.

थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
युक्रेन -रशिया युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर लादला आहे. त्यांचे म्हणणे असे की, भारतावर दबाव वाढवला तर रशिया युद्ध थांबवेल. परंतू, काही दिवसांपूर्वीच पुतीन-ट्रम्प भेटीत काहीच हाती लागले नाही, त्यामुळे २५ टक्क्यांवरून टेरिफ ५० टक्क्यांवर वाढविण्यात आले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने भारताला ५ टक्के डिस्काऊंट देत कच्चे तेल देणे सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारत काही केल्या अमेरिकेसोबत मांसाहारी दुधाची आणि शेती उत्पादनांची डील करत नाहीय म्हणून ट्रम्प थयथयाट करत आहेत. अशातच रशिया देखील ट्रम्पना भीक घालत नाहीय. अमेरिकेने काही भारतीय पेट्रोलिअम खरेदी करणाऱ्या कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. परंतू, तरीही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली आहे.
अमेरिकेच्या धमक्या आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीला न जुमानता, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरू ठेवेल. भारताला रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर ५ टक्के सूट मिळत राहील, असे रशियाचे भारतातील उप-व्यापार प्रतिनिधी, एव्हगेनी ग्रिवा यांनी सांगितले आहे.
रशियाकडून तेल खरेदी करून भारत युद्धात (रशिया-युक्रेन युद्ध) त्याला मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. अमेरिका भारतावर आणखी दंडही आकारणार आहे. यामुळे भारताचा तोटा होईलच परंतू अमेरिकन लोकांनाही लुबाडले जाणार आहे. कारण त्यांना भारतीय वस्तूंवर जादा पैसे मोजावे लागणार आहेत.