शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचा दर आठवड्याचा युद्धखर्च ३ अब्ज डॉलर; युद्धामुळे देशातील सर्व अर्थव्यवहार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 04:54 IST

जेरुसलेम : इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे आणि आर्थिक व्यवहारांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इस्रायलला दर आठवड्याला अंदाजे ९.४ अब्ज न्यू शेकेल ...

जेरुसलेम : इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे आणि आर्थिक व्यवहारांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इस्रायलला दर आठवड्याला अंदाजे ९.४ अब्ज न्यू शेकेल (३ अब्ज अमेरिकी डॉलर) इतका खर्च सोसावा लागू शकतो, असा इशारा इस्रायलच्या अर्थ मंत्रालयाने दिला आहे.

    अर्थ मंत्रालयाचे महासंचालक इलान रोम यांनी होम फ्रंट कमांडचे प्रमुख मेजर जनरल शाई क्लॅपर यांना पत्र लिहून गुरुवारपासूनच आर्थिक व्यवहारांवरचे निर्बंध हटवावेत तसेच व्यवसाय आणि कामाची ठिकाणे टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. 

युद्धामुळे अर्थव्यवस्था बंद ठेवल्याने त्याची आर्थिक किंमत मोजावी लागते. अशा वेळी देशाची सुरक्षा व अर्थव्यवस्थेच्या गरजा यांच्याकडे एकाच वेळी लक्ष द्यायला हवे, असे इलान रोम यांचे म्हणणे आहे. गेल्या अडीच वर्षांपासून इस्रायलची अर्थव्यवस्था वाढत्या संरक्षण गरजा व युद्धाच्या परिणामांमुळे मोठ्या दबावाखाली आहे. 

कडक निर्बंधांचा मोठा फटका, वर्क फ्राॅम होम शनिवारी सकाळी इराणविरुद्ध संयुक्त मोहीम सुरू केल्यानंतर, इस्रायल संरक्षण दलाच्या होम फ्रंट कमांडने देशव्यापी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.यामध्ये सर्व प्रकारच्या मेळाव्यांवर बंदी, शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कामाची ठिकाणे बंद, कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे प्रोत्साहन यांचा समावेश होता. सोमवारी या निर्बंधांचा आढावा घेतल्यानंतर ते शनिवार रात्रीपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

‘रेड’ ऐवजी ‘ऑरेंज’ अलर्टची मागणी, मोठे नुकसानसध्या इस्रायलमध्ये ‘रेड अलर्ट’ लागू आहे, त्याने आठवड्याला ९.४ अब्ज शेकेलचे नुकसान होत आहे. इलान रोम यांनी हे निर्बंध ‘ऑरेंज अलर्ट’ (मर्यादित आर्थिक व्यवहार) स्तरावर आणण्याची विनंती केली आहे.ऑरेंज अलर्ट लागू केला तर इस्रायलचे आठवड्याला होणारे नुकसान १.५ अब्ज डॉलर इतके खाली येऊ शकते. या अलर्ट दरम्यान देशातील शैक्षणिक संस्था बंद राहतात, परंतु कामाची ठिकाणे आणि काही आर्थिक व्यवहार सुरू ठेवता येऊ शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Israel's Weekly War Cost: $3 Billion; Economy Paralyzed

Web Summary : Israel faces a $3 billion weekly war cost due to conflict and restrictions. The Ministry urges easing restrictions to revive the economy, balancing security with economic needs. Current 'Red Alert' measures severely impact businesses; a shift to 'Orange Alert' could halve losses.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणWarयुद्ध