शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

"बसमध्ये भरून गाझाला पाठवेन"; युद्धादरम्यान आपल्या नागरिकांवरच संतापले इस्रायली अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 2:16 PM

Israel Palestine Conflict : इस्रायलच्या हाइफा शहरात गाझावरील इस्रायली बॉम्बहल्ल्यांच्या विरोधात निदर्शने झाली, ती पोलिसांनी थांबवली आणि 6 आंदोलकांना अटकही केली.

गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यात मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी मारले जात आहेत, त्यामुळे अनेक देशांमध्ये निदर्शने होत आहेत. युद्धाबाबत इस्रायलमध्ये काही लोक निदर्शनेही करत आहेत, त्याबाबत इस्रायलच्या पोलीस प्रमुखांनी मोठं विधान केलं आहे. इस्रायलमध्ये गाझाच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्यांविरोधात झिरो टॉलरेन्स धोरण अवलंबले जाईल आणि गाझाच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्यांना बसमध्ये भरून गाझाला पाठवले जाईल, जेथे इस्रायल गेल्या काही दिवसांपासून बॉम्बफेक करत आहे, असं पोलीस प्रमुख कोबी शबताई यांनी म्हटलं आहे.

इस्रायलच्या हाइफा शहरात गाझावरील इस्रायली बॉम्बहल्ल्यांच्या विरोधात निदर्शने झाली, ती पोलिसांनी थांबवली आणि 6 आंदोलकांना अटकही केली. या अटकेनंतर शबताई यांचे विधान इस्रायली माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये ते आंदोलकांना गाझामध्ये पाठवण्याची धमकी देत ​​होते. अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, शबताई म्हणाले की, "ज्यांना इस्रायली नागरिक म्हणून जगायचे आहे, त्यांचे स्वागत आहे. आणि ज्यांना गाझासोबत राहायचे आहे त्यांचेही स्वागत आहे. मी त्यांना गाझाला जाणाऱ्या बसेसमध्ये बसवून तिथे पाठवीन."

"कोणत्याही चिथावणीच्या घटनेबाबत इस्रायलमध्ये झिरो टॉलरेन्स धोरण अवलंबले जाईल... अशा निषेधाला कोणत्याही प्रकारे परवानगी दिली जाणार नाही" असंही शबताई म्हणाले. तसेच इस्रायल युद्धाला सामोरे जात आहे... आम्ही अशा परिस्थितीत नाही आहोत की लोक येऊन आमची परीक्षा घेतील असंही सांगितलं. इस्रायली पोलिसांचे प्रवक्ते एली लेवी यांनी बुधवारी आर्मी रेडिओशी बोलताना सांगितलं की, 7 ऑक्टोबरपासून गाझा युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलमध्ये 63 जणांना दहशतवादाचे समर्थन किंवा भडकवल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी Ynet या वृत्तसंस्थेला सांगितले की, इस्रायलमध्ये राहणारे पॅलेस्टाईन समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटवली जात आहे. गाझा पट्टीवर नियंत्रण ठेवणाऱ्या हमासला पाठिंबा दर्शवणाऱ्यांना अटक केली जात आहे. गाझा पट्टीवर ताबा ठेवणाऱ्या पॅलेस्टाईनच्या हमासच्या सैनिकांनी इस्रायलवर हल्ला करून किमान 1400 लोक मारले आणि 40,000 हून अधिक जखमी झाले. हमासच्या सैनिकांनी जवळपास 200 लोकांना ओलीसही ठेवलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध