शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुझवरील संकट कायमचं नष्ट करू, इस्रायली पंतप्रधानांनी सांगितला प्लॅन; सौदी, UAE, कतार ऐकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 14:59 IST

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची स्थिती मजबूत आहे, त्यामुळे दुसरा मार्ग शोधणे हीच योग्य रणनीती असेल असं नेतान्याहू यांनी मान्य केले. 

तेल अवीव - मध्य पूर्वेतील युद्धात इराणने स्ट्रेट होर्मुझ रोखल्याने जागतिक ऊर्जा संकट ओढावले. होर्मुझ सामुद्रधुनीमधून जगातील २० टक्के तेल वाहतूक होते. इराणकडून या जलमार्गात अडथळे आणले गेले. त्यामुळे तेलाच्या किंमती भडकल्या. त्यामुळे होर्मुझमध्ये निर्माण झालेल्या संकटावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे असं विधान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले. नेतन्याहू यांनी दीर्घकालीन उपाययोजना सांगत नवीन एनर्जी पाइपलाईन बनवायला हवी, जी आखाती देशांमधून तेल आणि गॅस भूमध्य सागरापर्यंत घेऊन जाईल असा पर्याय नेतन्याहू यांनी सुचवला.

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही इराणकडून होर्मुझ मार्ग रोखून धरण्यात आला आहे. त्यात या परिसरात वाहतूक सुरळीत करण्यात अमेरिका-इस्रायलला अपयश आले आहे. त्यात नेतन्याहू यांनी हे विधान केले. नेतन्याहू यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील दीर्घकालीन उपाय म्हणजे ऊर्जा पाइपलाईनचा मार्ग बदलून त्या सौदी अरेबियामार्गे, लाल समुद्र आणि भूमध्य समुद्राकडे वळवणे हा आहे. यामुळे इराणच्या भौगोलिक चेक पाँईटला पूर्णपणे बगल दिली जाईल असं त्यांनी सांगितले. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची स्थिती मजबूत आहे, त्यामुळे दुसरा मार्ग शोधणे हीच योग्य रणनीती असेल असं नेतान्याहू यांनी मान्य केले. 

होर्मुझच्या सामुद्रधुनीनं वाढवलं इस्रायलचं टेन्शन

जागतिक तेल निर्यातीपैकी २० टक्के तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. आखाती प्रदेशातील तेल आणि गॅस या मार्गाने जगभरातील अनेक देशांमध्ये पोहोचतात. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि ओमान यांचे प्रादेशिक सागरी क्षेत्र होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये येते परंतु सामुद्रधुनीच्या पलीकडे इराणच्या उपस्थितीमुळे सागरी वाहतुकीसाठी हा मार्ग असुरक्षित बनला आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीचा शस्त्र म्हणून वापर केला आहे. जागतिक ऊर्जा संकट निर्माण करण्याचा इराणचा प्रयत्न आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर यशस्वी लष्करी तोडगा काढला तरी त्यातून केवळ अल्पकालीन स्थिरता मिळू शकते. त्यामुळे या सामुद्रधुनीचे सामरिक महत्त्व संपुष्टात आणणे हाच एक दीर्घकालीन उपाय ठरेल असं नेतन्याहू यांनी सांगितले.

दरम्यान, इस्रायलने इराणची क्षेपणास्त्र क्षमता कमकुवत केली आहे आणि देशातील प्रमुख अणुशास्त्रज्ञांना ठार केले आहे. इराणचे अण्वस्त्रे मिळवण्याचे आणि अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणारी क्षेपणास्त्रे विकसित करण्याचे प्रयत्न रोखले जातील असा इशाराही नेतन्याहू यांनी दिला. गेल्या २८ फेब्रुवारीपासून इराणचे अमेरिका आणि इस्रायलसोबत युद्ध सुरू आहे. इस्रायल-अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते मारले गेले. त्यानंतर इराणने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर हल्ले केले. त्याशिवाय होर्मुझ सामुद्रधुनी रोखून जागतिक दबाव वाढवला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Netanyahu's plan to bypass Hormuz Strait: A new energy pipeline.

Web Summary : Israeli PM proposes a pipeline bypassing Hormuz, redirecting Gulf oil/gas via Saudi Arabia to the Mediterranean, countering Iranian control and stabilizing global energy supply amidst ongoing tensions.
टॅग्स :Israelइस्रायलUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरsaudi arabiaसौदी अरेबियाUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती