शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
5
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
6
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
7
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
8
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
9
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
10
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
11
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
12
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
13
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
14
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
15
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
16
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
17
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
18
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
19
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
20
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट

गाझा पट्टीत Israel ची कारवाई सुरूच; आज पुन्हा इस्रायलनं केलं १० मिनिटांपर्यंत जबरदस्त बॉम्बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 09:29 IST

Israel Airstrike : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू आहे संघर्ष.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू आहे संघर्ष.सोमवारी इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात गाझा शहरातील अनेक ठिकाणी एअरस्ट्राईक।

इस्त्रायली लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा गाझा शहरावर बॉम्ब हल्ला केला आहे. सोमवारी सकाळी इस्त्रायकडून गाझा पट्टीतील विविध ठिकाणी दहा मिनिटं बॉम्ब डागण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीत निरनिराळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एअर स्ट्राईक केला. सोमवारी सकाळी शहराच्या दक्षिण भागात दहा मिनिटं सातत्यानं बॉम्ब डागण्यात आले. हा एअरस्ट्राईक २४ तासांपूर्वी करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकपेक्षाही मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये ४२ पॅलेस्टीनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, इस्रायलच्या डिफेन्स फोर्सनं आपल्या दिलेल्या वक्तव्यात IDF फायटर जेट्स गाझा पट्टीतील दशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करत असल्याचं म्हटलं. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान गाझा पट्टीत इस्रायलनं रविवारी मोठ्या प्रमाणात बॉम्बचा वर्षाव केला होता. या हवाई हल्ल्यात ४२ पॅलेस्टीनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची आणि अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये काही इमारतींचंही मोठं नुकसान झालं होतं. इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील भीषण संघर्ष अद्यापही सुरु आहे. अशातच इस्रायली सैन्याने गाझावर केलेल्या भीषण हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त झाल्याची माहिती रविवारी समोर आली होती. (israel palestine clash israeli army targets home of top hamas leader in gaza) इस्रायलच्या लढाऊ विमानांद्वारे हवाई हल्ले सुरूच आहेत. तर, हमासदेखील सातत्याने रॉकेट हल्ला करत आहे. हमासने सुमारे २ हजार रॉकेट डागले असल्याचा दावा इस्रायलने केला होता. यापूर्वी करण्यात आलेल्या हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्याचे घर उद्ध्वस्त झाल्याची माहिती इस्रायली सैन्याकडून देण्यात आली होती. सेना प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल हिदाई जिल्बरमॅन यांनी यासंदर्भातील माहिती इस्रायली रेडिओला दिली. मीडिया ऑफिसेसचे मोठे नुकसानइस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील असोसिएट प्रेस, अल जझीरासह अन्य मीडिया ऑफिसेसचे मोठे नुकसान झाले आहे. मीडिया ऑफिसेसची बिल्डिंग इस्त्रायलच्या हल्ल्यात अक्षरश: उद्ध्वस्त झाली. इस्रायलच्या सैन्याने गाझा शहरातील काही बिल्डिंग रिकाम्या करण्याबाबत इशारा दिला होता. याच परिसरात असोसिएट प्रेस आणि इतर मीडियाच्या बिल्डिंग आहेत. त्यानंतर तासाभरात याठिकाणी इस्रायलने एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात १२ मोठ्या बिल्डिंग उद्ध्वस्त झाल्या. 

टॅग्स :Israelइस्रायलGaza Attackगाझा अटॅकPalestineपॅलेस्टाइनMediaमाध्यमेBombsस्फोटके